शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘शतजन्म शोधिताना’ कार्यक्रमास सखी सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: December 16, 2014 00:20 IST

मिरजेत आयोजन : सखी मंच, बाल विकास मंचचा उपक्रम

सांगली : ‘लोकमत’ सखी मंच, बाल विकास मंच, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई आणि महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शोध हा नवा शतजन्म शोधिताना’ हा वीर सावरकरांच्या तेजोमय जीवनावर व अलौकिक प्रतिभेवर आधारित पहिला भव्य कार्यक्रम दि. १३ रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये पार पडला. या कार्यक्रमास सखी सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.५० कलाकारांचा सहभाग असलेल्या या अडीच तासाच्या दृकश्राव्य, संगीत, नृत्य कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बहुमोल विचार निवेदनातून उलगडले गेले. सावरकरांनी रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना अस्पृश्यता निवारणाचे काम केले. सावरकरांनी लिहिलेल्या ‘जयोस्तुते’, ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीतांबरोबरच त्यांनी लिहिलेली लावणी, पोवाडा, फटका याचे कार्यक्रमातून सादरीकरण झाले. सावरकरांनी चाफेकर बंधू, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी यांच्यावर लिहिलेले पोवाडे ऐकून रोमांच उभे राहिले. सावरकरांची छायाचित्रे, त्यांच्या भाषणाची झलक, ‘वीर सावरकर’ चित्रपटातील दृश्ये या कार्यक्रमात पाहायला मिळाली. सावरकरांच्या ‘संगीत उ:शाप, संगीत उत्तरक्रिया’ या नाटकांतील प्रवेशही सादर झाले. या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि निवेदन वृत्त निवेदिका मंजिरी मराठे यांचे आहे. वृत्तनिवेदक भूषण करंदीकर हे सहनिवेदक होते. संगीत दिग्दर्शन वर्षा भावे यांनी, नृत्य दिग्दर्शन ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना रूपाली देसाई यांनी केले.वर्षा भावे, केतन पटवर्धन, मयूर सुकाळे, सोमेश नार्वेकर, सायली महाडिक, क्षीतिजा जोशी, अवंती बपोरीकर हे गायक, दीपक वेलणकर, अंजू आमडेकर हे कलाकार, संगीतकार कमलेश भडकमकर यांच्यासह विजय जाधव, हनुमंत रावडे, अमेय ठाकूर-देसाई, सचिन जगताप, सागर गिजरे हे वादक कार्यक्रमात सहभागी होते. निर्मिती प्रमुख सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आहेत. (प्रतिनिधी)