शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

‘हॅबिटॅट २०१५ ’ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: November 30, 2015 01:12 IST

बांधकाम क्षेत्रात अनेक बदल घडत आहेत. त्यातही या नवीन तंत्रज्ञानाची ओळख सांगलीकरांपर्यंत पोहोचणे दुरापास्त असताना,

सांगली : स्वत:चं घर बांधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी अनेकदा निश्चित मार्गदर्शन मिळत नसल्याने, त्या स्वप्नांची पूर्ती करताना होणारी घुसमट दूर करण्यासाठी इंजिनिअर्स अ‍ॅण्ड आर्किटेक्टस् असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हॅबिटॅट २०१५’ या प्रदर्शनास रविवारी जोरदार प्रतिसाद मिळाला. नामवंत कंपन्यांनी लावलेल्या आपल्या वस्तूंची व बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या लक्षवेधी स्टॉल्सवर जोरदार गर्दी होती. केवळ सांगलीच नव्हे, तर बाहेरगावहून आलेल्या अनेकांनी प्रदर्शनास भेट देत प्रदर्शनाचे कौतुक केले. सांगलीतील कल्पद्रुम मैदानावर शनिवारपासून ‘हॅबिटॅट २०१५’ या प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. आज प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी विशेषत: सायंकाळी प्रदर्शनस्थळी गर्दीचा महापूर दिसून आला. बांधकाम क्षेत्रात अनेक बदल घडत आहेत. त्यातही या नवीन तंत्रज्ञानाची ओळख सांगलीकरांपर्यंत पोहोचणे दुरापास्त असताना, इंजिनिअर्स अ‍ॅण्ड आर्किटेक्टस् असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामुळे बांधकाम क्षेत्रातील नवीन बदल, पर्यावरणपूरक लाइटिंग, टाईल्स, त्याचबरोबर निसर्गपूरक एनर्जी उत्पादनांच्या स्टॉल्सवर नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. बांधकाम क्षेत्रातील देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामवंत कंपन्यांनी प्रदर्शनात भाग घेतल्याने, आजपर्यंत मुंबई व पुण्यासह मेट्रो शहरांपुरत्याच मर्यादित असणाऱ्या घरबांधणीतील उत्पादनांची ओळख सांगलीकरांनाही होत आहे. प्रदर्शनात असणाऱ्या १२५ स्टॉल्समधून केवळ बांधकामच नव्हे, तर घरबांधणी करताना पर्यावरणाचा समतोल राखला जाईल याची खबरदारी घेणारी उपकरणेही या प्रदर्शनातून पाहण्यास मिळत आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष सुहास जनाज, माजी अध्यक्ष प्रमोद परीख, एस. पी. तायवाडे पाटील, प्रमोद चौगुले, रणदीप मोरे, प्रमोद शिंदे, प्रशांत पाटील-मजलेकर, जयंत परीख, केदार टाकवेकर, योगेश लोहोकरे आदी प्रदर्शनाचे नियोजन करीत आहेत. (प्रतिनिधी)घर बांधणारी प्रत्येक व्यक्ती द्विधा मन:स्थितीत असते. त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी ‘हॅबिटॅट’ ही संकल्पना असून, यास सांगलीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बांधकाम क्षेत्रात नवनवीन बदल घडत आहेत. प्रदर्शनस्थळी सायंकाळी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करून स्थानिक कलांना वाव देण्याचा प्रयत्न होत आहे. प्रतिसाद प्रेरणा देणारा आहे. - प्रमोद परीख, माजी अध्यक्ष, इंजिनिअर्स अ‍ॅण्ड आर्किटेक्टस् असोसिएशन, सांगलीप्रदर्शनस्थळी वाय फाय सेवाहॅबिटॅट २०१५ प्रदर्शनास मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, प्रदर्शन काळात या परिसरात पूर्णपणे वाय फाय सुविधा पुरविण्यात आल्याने प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. वाय फाय सुविधेमुळे काही मिनिटात देवाण-घेवाण होत असल्याने सहभागी कंपन्यांनीही आयोजकांच्या या नव्या सुविधेचे स्वागत केले.