शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

ले-आॅफवरून अध्यक्ष-कामगारांत वादावादी

By admin | Updated: February 15, 2017 23:29 IST

वसंतदादा साखर कारखाना : अध्यक्षांकडून पगाराचे आश्वासन

सांगली : येथील वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी कामगारांपुढे ‘ले-आॅफ’ घेण्याचा प्रस्ताव दिला असून, यावरूनच पाटील आणि कामगारांमध्ये बुधवारी वादावादी झाली. यापुढे कामावर येणाऱ्यांना पगार देऊ शकत नाही आणि जे ‘ले-आॅफ’ घेतील, त्यांचेही नुकसान करणार नाही. त्यांना मे, डिसेंबरचे पगार दोन दिवसात देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे वादावर पडदा पडला.वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना ‘ले-आॅफ’ देण्यावरून गेल्या दोन महिन्यापासून कारखाना प्रशासन आणि कामगारांमध्ये संघर्ष चालू आहे. कामगार युनियनचे पदाधिकारीही वादात पडले आहेत. बुधवारी कामगार कारखान्याच्या प्रवेशद्वारामध्ये जमले होते. साखर कामगार युनियनचे अध्यक्ष विलास पाटील, सरचिटणीस प्रदीप शिंदे यांनी कामगारांच्या मे, डिसेंबर महिन्याच्या पगाराचा प्रश्न उपस्थित करून, अध्यक्ष पाटील यांना ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. अखेर पाटील यांनी, कार्यालयात बसून चर्चा करून तोडगा काढण्याची सूचना केली. त्यानुसार कारखान्याच्या कार्यालयात विशाल पाटील व युनियनचे पदाधिकाऱ्यांत चर्चा झाली. अखेर नियमित कामगारांना मे, डिसेंबर आणि हंगामी कामगारांना डिसेंबरच्या पगाराचे एकत्रित एक कोटी ७२ लाख रुपये दोन दिवसात देण्यात येतील, असे आश्वासन अध्यक्षांनी दिले. सध्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कामगारांना यापुढे पगार देता येणार नाही. त्यामुळे कामगारांनी ‘ले-आॅफ’ घ्यावा. जरी कारखाना अन्य संस्थेकडे चालविण्यास दिला तरी, त्या कामगारांना थकीत पगारासह न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. यातूनही जे कामगार कामावर येतील, त्यांचे पगार मात्र मी देऊ शकणार नाही. ज्यावेळी अन्य संस्थेशी करार होईल, त्यावेळी त्यांच्याकडून पैसे मिळाल्यानंतरच यापुढील पगार मिळतील, असेही विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.यावेळी काही कामगारांनी, थकीत पगार, फंड आणि अन्य देण्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. पाटील यांनी, कारखाना चालवायला दिल्यानंतर त्यांच्याकडून करारापोटी येणाऱ्या पैशातूनच ही थकीत देणी देणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेत विशाल पाटील यांच्या प्रस्तावास सहमती दर्शविल्याचे प्रदीप शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)