शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना निकृष्ट सोयाबीनचा फटका

By admin | Updated: August 11, 2014 22:42 IST

मिरज पश्चिम भागातील चित्र : बियाणांमुळे नुकसान

सोमनाथ डवरी - कसबे डिग्रज  - मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, कवठेपिरान, समडोळी, तुंग येथील सुमारे ९०० शेतकऱ्यांना निकृष्ट सोयाबीन बियाणाचा फटका बसला आहे.यावर्षी सोयाबीन बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही कंपन्यांनी आकर्षक बॅगेत निकृष्ट सोयाबीन भरून त्याची भरमसाट दराने विक्री केली. मात्र या सोयाबीनची उगवण क्षमता कमी असून वाढ कमी आहे. या निकृष्ट बियाणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कंपनीच्या प्रतिनिधींकडे, विक्रेत्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे तीन हजार एकर सोयाबीन आहे. पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने रात्री-अपरात्री जागरण करून पाणी देऊन वारंवार औषध फवारणी केली. परिसरात एका कंपनीने ६०० बॅगा सोयाबीन बियाणे भरमसाट दराने विकले आहे. या सोयाबीनची वाढ तोकडी आहे. इतर सोयाबीनच्या तुलनेत आणि प्रतिवर्षाप्रमाणे उत्पादनाच्या मानाने यावर्षी या कंपनीच्या पिकांची वाढ अत्यंत तोकडी आहे. या सोयाबीनची ८-१० इंचच वाढ दिसते. इतर पिके २४ इंचापेक्षा जादा वाढली आहेत. या सोयाबीनला वाढ नसल्याने शेंगांची संख्या अत्यंत कमी आहे.कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना ही वाढ खुंटलेली बाब, लवकर परिपक्वता, शेंगांची कमी संख्या दाखविली असता, त्यांनी भेट टाळून थातूरमातूर उत्तरे दिली. कोणाकडे तक्रार करणार असाल तर करा, आमची कंपनी मोठी आहे, अशी उडवाउडवी केली जात आहे. या कंपनीचे सुमारे १२०० एकर क्षेत्र आहे. उत्पादन घटल्यामुळे लाखोंचे आर्थिक नुकसान होणार आहे.याप्रकरणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करावी आणि कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. काही शेतकरी ग्राहक न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत.