शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

पुण्याजवळ सुरू करणार सोनहिरा ग्लोबल युनिव्हर्सिटी

By admin | Updated: September 5, 2014 23:28 IST

पतंगराव कदम : नवी मुंबईत वैद्यकीय महाविद्यालय

कडेगाव : ‘अ’ श्रेणीतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ म्हणून भारती विद्यापीठाची ख्याती आहे. कडक शिस्त हे वैशिष्ट्य आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिकांच्या आग्रहास्तव तेथील संस्थांच्या समन्वयाने २0 शाखा अमेरिकेत सुरू केल्या आहेत. याशिवाय दुबई येथेही शाखा सुरू आहे. नवी मुंबई येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयही सुरू करणार आहे. पुणे जिल्ह्यात लवळे येथे ‘सोनहिरा ग्लोबल युनिव्हर्सिटी’ सुरू करणार आहे, असे प्रतिपादन डॉ. पतंगराव कदम यांनी केले.कडेगाव येथे भारती विद्यापीठाच्या बयाबाई कदम कन्या महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कऱ्हाड, पलूस, कडेगाव व खानापूर तालुक्यातील शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जि. प. सदस्य शांताराम कदम उपस्थित होते.डॉ. कदम म्हणाले की, पानिपतजवळ सोनिपत येथेही भारती विद्यापीठाने शैक्षणिक संकुल सुरू करण्याचा निर्धार केला आहे. शिक्षकी पेशाला व भारती विद्यापीठाच्या नावलौकिकाला साजेसे ‘ज्ञानदानाचे’ काम येथील शिक्षकांनी करावे, असे डॉ. कदम यांनी सांगितले.प्राचार्या सौ. सुलक्षणा कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी श्रीपतराव कदम प्रशाला व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य पी. व्ही. मोहिते, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एम. सावंत, कऱ्हाड येथील लॉ कॉलेजच्या प्राचार्या पूजा नरवाडकर आदी उपस्थित होते. प्रा. सूर्यकांत बुरुंग यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. एम. एस. खोत यांनी आभार मानले. (वार्ताहर)विनोबांपासून प्रेरणाडॉ. कदम म्हणाले की, मी १९६९ मध्ये आचार्य विनोबा भावे यांना भेटलो. आजची तरुण पिढी अस्वस्थ आहे, यावर उपाय सांगा, अशी त्यांना चिठ्ठी लिहून दिली. त्यावर ‘पटेल ते करावे, पचेल तेच खावे आणि समाजासाठी जगावे’ असे उत्तर त्यांनी दिले. विनोबा भावे यांच्या उत्तरातून मी प्रेरणा घेतली आणि कामास सुरुवात केली.