लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सोनाली सुहास कुरणे यांना ‘आंतरराष्ट्रीय सेवा गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
डॉ. सोनाली कुरणे या जायंट्स ग्रुपच्या माजी अध्यक्ष आहेत. महापुरासह कोरोना संकटकाळात त्यांनी गरजूंना मदत केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. औरंगाबाद येथील शब्दगंध समूह प्रकाशन, ग्रंथमित्र युवा मंडळ, विद्यार्थीप्रिय शिक्षक संघटना औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठी विभागप्रमुख डॉ. रमेश जाधव, बीडच्या आम्रपाली प्रकाशनचे लखनजी काशीकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी संदीप त्रिभुवन व रमा त्रिभुवन उपस्थित होते.