सागाव : वाडीभागाई (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारला जात आहे. यासाठी ग्रामस्थांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. यामध्ये सेंद्रीय व गांडूळ खताची निर्मिती करण्यात येणार असून, अत्यल्प दरात या खताची विक्री शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.घनकचरा व्यवस्थापन योजनेंतर्गत शिराळा तालुक्यातील वाडीभागाई गावाची निवड झाली असून, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ७.५0 लाख रुपये निधी यासाठी मंजूर झाला आहे. याच्या पहिल्या टप्प्यामध्ये गावामधील प्रत्येक घरातील घनकचरा एकत्रित गोळा करुन त्यापासून सेंद्रीय व गांडूळ खताची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने घनकचरा साठविण्यासाठी पंधरा बाय सहा फुटाच्या दोन टाक्या बांधण्यात आल्या आहेत, तर गांडूळ खतासाठी दहा बाय सहा फुटाच्या दोन टाक्या बांधण्यात आल्या आहेत.ग्रामपंचायतीच्यावतीने गावामधील प्रत्येक घरामध्ये लहान कचराकुंड्या पुरविण्यात येणार आहेत. त्याचबरेबर सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात येणार आहेत. घरामध्ये सांडणारा कचरा इतरत्र न टाकता तो कचराकुंड्यांमध्येच टाकावा, असे आवाहन करणारे पत्रक लावण्यात येणार आहे. दररोज ट्रॅक्टरच्या साहाय्याने घनकचरा एकत्रित करुन त्यापासून सेंद्रीय व गांडूळ खताची निर्मिती करण्यात येणार आहे. या खताची शेतकऱ्यांना अल्यल्प दरात विक्री होणार आहे. (वार्ताहर)घनकचरा व्यवस्थापन योजनेंतर्गत गावाला ७ लाख ५0 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. गावातील घनकचरा एकत्रित करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. प्लॅस्टिक पिशवीमुक्त गाव अशी नवीन ओळख निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असून, त्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.- रामचंद्र पाटील, सरपंच, वाडीभागाई.
वाडीभागाईत घनकचरा प्रकल्प
By admin | Updated: December 16, 2014 00:11 IST