शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

शौर्यपदकधारक सैनिकांना मालमत्ता करातून सूट देणार : सांगली महासभेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:46 AM

सांगली : महापालिका क्षेत्रातील सरंक्षण दलातील शौर्यपदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सूट देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे चर्चेला आणला आहे. संरक्षण दलातील अविवाहित शहीद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तांनाही

ठळक मुद्दे गतसभेच्या इतिवृत्तावरून वादाची शक्यता

सांगली : महापालिका क्षेत्रातील सरंक्षण दलातील शौर्यपदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सूट देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे चर्चेला आणला आहे. संरक्षण दलातील अविवाहित शहीद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तांनाही मालमत्ता करातून सूट देण्याचाही विषय महासभेपुढे आणला आहे महापालिकेची महासभा १९ मार्चला सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. मागची महासभा आरक्षित जागेवरील घर नियमित करण्यासाठी अनेक सदस्यांच्या उपसूचनेद्वारे आरक्षणे रद्द करण्याच्या विषयावरून वादळी ठरली होती. यावेळी महापौर शिकलगार यांनी महासभाच गुंडाळली होती. महासभेनंतर उपसूचनेवरून आंदोलने झाली. महापौरांनी उपसूचनेव्दारे आलेले सर्व प्रस्ताव रद्द केले. प्रत्यक्ष पाहणी करून विषयपत्रिकेवर घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका महापौरांनी घेतल्याने यावर तात्पुरता पडदा पडला.

मागील इतिवृत्त मंजुरीवरून येत्या महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. या महासभेत मिरजेतील ७६३.८० चौरसमीटर इतका खुला भूखंड विकसित करण्यासाठी मोफत मागणी केल्याचा विषय महासभेपुढे आणला आहे. मात्र, प्रशासनाने विषयपत्र देताना भाड्याने देण्याचा विषय आणला आहे.

मुळात महापालिकेच्या मालकीची कोणतीही जागा मोफत देण्याची तरतूदच कायद्यात नाही, असे असताना प्रशासनाने असा विषय आणल्याने सत्ताधारी अडचणीत आले आहेत. यावर वादळी चर्चा होईल, अशी शक्यता आहे.यावेळी गतवेळी शिल्लक राहिलेल्या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभा वादळी होणार आहे.चौकाचे बाळासाहेब ठाकरे नामकरणकोल्हापूर रस्त्यावरील जमिनीमधील भोबे गटार जोडण्यासाठी जावेद शेख यांची जागा ताब्यात घेऊन महापालिका मालकीची पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव महासभेपुढे आला आहे. याचबरोबर स्टेशन चौकास हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, असे नामरकण करण्याचा प्रस्तावही चर्चेला आणला आहे. महापालिकेची महासभा १९ मार्चला सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात येणार असून, ही सभा वादळी होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. या महासभेमध्ये ऐनवेळचे विषयही चर्चेत येणार आहेत.