शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जेतून शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST

सांगली : जिल्ह्यातील २८ ठिकाणी १४० मेगावॅटचे सौरऊर्जेचे प्रकल्प तयार होणार आहेत. या ठिकाणी तयार होणारी वीज कृषिपंपांना दिवसा ...

सांगली : जिल्ह्यातील २८ ठिकाणी १४० मेगावॅटचे सौरऊर्जेचे प्रकल्प तयार होणार आहेत. या ठिकाणी तयार होणारी वीज कृषिपंपांना दिवसा अखंडित आठ तास देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील गेल्या ३० वर्षांतील अंधार संपुष्टात येऊन त्यांच्या जीवनात सौरऊर्जेचा प्रकाश पडणार आहे.

शेतकऱ्यांना ३० वर्षांत कृषिपंपांना अखंडित दिवसा वीज मिळतच नाही. अपवादात्मक दिवस वीज मिळते, तीही अखंडित नाही. बहुतांश वेळा रात्रीचीच वीज मिळते. रात्रीच्या भारनियनामुळे सर्पदंश, हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. यावर उपाय म्हणून शासनाने सौरऊर्जेचा चांगला मार्ग स्वीकारला आहे. या ऊर्जेतून शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश पडणार आहे. ते म्हणजे, महावितरण कंपनी ज्या गावांमध्ये जागा उपलब्ध होईल. तेथे चार ते पाच मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प करणार आहे. येथे तयार वीज जवळच्या वीज उपकेंद्रात एकत्रित करून त्या गावातील शेतीपंपाला दिवसा अखंडित आठ तास देणार आहे. जनरेशन कंपनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमधून जत तालुक्यातील उमदी, उटगी, सोनलगी, वाळेखिंडी, बोर्गी खुर्द, दरीकुणूर; खानापूर तालुक्यातील नागेवाडी, मिरज तालुक्यातील आरगची निवड केली आहे. या ठिकाणी दोन ते सहा मेगावॅटपर्यंत सौरऊर्जा प्रकल्प होणार आहे. महावितरणनेही केंद्र शासनाच्या योजनेतून आटपाडी तालुक्यातील करगणी, माडगुळे, झरे, जत तालुक्यातील कोसारी, डफळापूर, जिरग्याळ, बनाळी, आसंगी, असंगी तुर्क, कोंत्यावबोबलाद, कंठी, बिर्नाळ, खानापूर तालुक्यातील आळसंद, पारे, कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी, म्हैसाळ एम, वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी, किल्ले मच्छिंद्रगड, लवाणमाची, आदी २० ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्पासाठी निश्चित केली आहेत. एक प्रकल्प उभारणीसाठी पाच ते दहा एकर जागेची गरज आहे. एक टक्काही प्रदूषण नसणारा आणि कमी खर्चातील हा यशस्वी प्रकल्प आहे.

चाैकट

कसबे डिग्रजचा प्रकल्प यशस्वी

महावितरणने कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे साडेचार मेगावॅटचा सौरऊर्जेचा प्रकल्प तयार केला आहे. महावितरणाला सव्वादोन ते अडीच रुपये प्रतियुनिटने वीज मिळत आहे. अन्य प्रकल्पांतून सध्या महावितरण साडेचार ते पावणेपाच रुपये प्रतियुनिटने वीज खरेदी करत आहे. या प्रकल्पातून तयार झालेली वीज तुंग (ता. मिरज) येथील उपकेंद्राला जोडली आहे. या केंद्रातील कृषी पंपांना दिवसा आठ तास वीज उपलब्ध होत आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.