शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सोने पॉलिशच्या बहाण्याने गंडा

By admin | Updated: August 3, 2014 01:58 IST

आष्ट्यातील प्रकार : महिलेला दीड लाखाला फसविले

आष्टा : येथील सौ. शोभा दत्तात्रय कदम (वय ५८) या विवाहितेस दागिने पॉलिश करून देतो म्हणून १ लाख ६५ हजारास फसविल्याची फिर्याद आष्टा पोलिसात देण्यात आली. आष्टा येथी दत्त वसाहत येथील शोभा कदम या सकाळी ११ च्या दरम्यान देवपूजा करून घरात जात असताना सुमारे २५ ते ३० वयोगटातील एक तरुण आला व त्याने तांबा, पितळ, साने चांदीच ीभांडी, दागिने पॉलिश करून मिळतील, असे सांगितले. पती दत्तात्रय कदम किराणा दुकान उघडण्यास गेल्याने शोभा या घरी एकट्याच होत्या. प्रथम त्यांनी लक्ष दिले नाही. मात्र देवपूजेचा तांब्याचा तांब्या पॉलिश करून देतो असे सांगितले व तो चकाचक पॉलिश करून दिला. त्यानंतर त्याने तुमच्याकडे सोन्याच्या बांगड्या आहेत का असे विचारले. शोभा यांनी त्या हातातून निघत नसल्याचे सांगितल्यावर भामट्याने त्याच्याकडील लिक्विड लावून बांगड्या व पाटल्या काढल्या त्या वाटीत ठेवल्या. प्रथम कुकर आणण्यास सांगितले. कुकरमध्ये पाणी ओतले व त्यात बांगड्या टाकून कुकरचे झाकण लावण्यास सांगितले व २० मिनिटांनी ३ शिट्ट्या झाल्यावर कु कर उघड्यास सांगितले. तोपर्यंत शेजारी ठेवलेल्या घरातील कुकर पाहून येतो, असे सांगितले. थोड्या वेळाने पाहिले असता ६ तोळ्याच्या ९० हजाराच्या बांगड्या व ५ तोळ्याच्या ७५ हजाराच्या पाटल्या असा १ लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन भामट्याने पोबारा केल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आष्टा पोलिसात धाव घेतली. (वार्ताहर)