शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांमधून निघतोय कडवट प्रश्नांचा धूर

By admin | Updated: November 23, 2015 00:29 IST

उद्योगांची संख्या घटली : भांडवल, मनुष्यबळाऐवजी निर्माण झाल्या अडचणी, रोजगार निर्मितीलाही बसला मोठा फटका--गुऱ्हाळघरांना घरघर-१

सहदेव खोत -- पुनवत -भांडवल व मनुष्यबळाचा अभाव, वाढलेला उत्पादन खर्च, उद्योगाकडे झालेले शासनाचे दुर्लक्ष व गुळात शेतकऱ्यांची होत असलेली गळचेपी अशा अनेक कारणांनी शिराळा व शाहूवाडी तालुक्याच्या वारणा, कडवी पट्ट्यातील गुऱ्हाळ उद्योग पुरता अडचणीत आला आहे. यावर्षी गुऱ्हाळ घरांच्या कमी झालेल्या संख्येवरून या उद्योगाला लागलेली उतरती कळा स्पष्टपणे जाणवत आहे. यंदाच्या हंगामात तर कित्येक गुऱ्हाळ मालकांनी या उद्योगाचा नादच सोडून दिला आहे. हंगाम सुरू करण्यासाठी ४ ते ५ लाखांपर्यंतचे भांडवल उभारणे शक्य नसल्याने तसेच मजूर नसल्याने अनेकांनी या उद्योगातून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात वारणा पट्ट्यात केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच गुऱ्हाळ घरे उरली आहेत. काही ठिकाणी तर बंद गुऱ्हाळ घरांचे केवळ अवशेष दिसत आहेत.सध्या अस्तित्वात असलेल्या गुऱ्हाळ घरांतून जिवाचे रान करून शेतकऱ्यांनी तयार केलेल्या गुळाला योग्य भाव मिळत नाही. गुऱ्हाळ उद्योगासाठी शासनाकडून प्रोत्साहनपर कोणतेही अनुदान नाही किंवा गुऱ्हाळ उद्योगाच्या उभारणीसाठी कर्जही नाही. गुऱ्हाळमालकांना या उद्योगासाठी पुरेसे मनुष्यबळ मिळत नाही. मनुष्यबळ मिळाले तर त्यांना टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक निधी नाही. वीजदर, इंधनाच्या दरात झालेली प्रचंड वाढ, गूळ उत्पादनासाठी आवश्यक पावडर, अ‍ॅसिड, भेंडी पावडर यांच्या वाढलेल्या किमती आदी अनेक कारणांनी गुऱ्हाळ उद्योगाचा ऱ्हास होऊ लागला आहे.शिराळा, शाहूवाडी तालुक्यातील वारणा, कडवी नदीचा पट्टा हा उसपट्टा म्हणून ओळखला जातो. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या गुऱ्हाळ घरांनी व त्यात तयार होणाऱ्या अविट चवीच्या गुळाने या पट्ट्याची वेगळीच ओळख निर्माण केली. या गुऱ्हाळ घरांनी हजारोजणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून दिले. गोडव्याची निर्मिती करणाऱ्या या गुऱ्हाळघरांमधून आता प्रश्नांच्या कडवटपणाचा धूर बाहेर पडत आहे. याच कडवट धुरात आता चालकांची होत असलेली घुसमट आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न यावर प्रकाशझोत टाकणारी मालिका वाचा आजपासून....यावर्षी गुऱ्हाळ घरांची संख्या घटली आहे. गुळाला दर नसल्याने शेतकरी गुऱ्हाळ घरांकडे ऊस पाठवायला तयार नाहीत. शेतकऱ्यांची गळितासाठी मनधरणी करावी लागत आहे. चांगल्या प्रतीचा ऊस शेतकरी गुऱ्हाळात गाळायला तयार नाहीत. गुऱ्हाळ उद्योगासाठी ही धोक्याची घंटा आहे.- प्रदीप पाटील, गुऱ्हाळ मालक, कणदूरएकंदरीत गुऱ्हाळ उद्योग हा विविध समस्यांच्या गर्तेत अडकला असून, अत्यावश्यक पदार्थ म्हणून शासनाने या उद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठी पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.