शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जलव्यवस्थापनासाठी स्मार्ट दृष्टिकोन हवा

By admin | Updated: March 5, 2017 23:30 IST

बर्ट सॅटिजिन : वालचंदमधील दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

सांगली : हवामानातील बदल आणि जलव्यवस्थापन यांचे जागतिक संदर्भ बदलत चालले आहेत. त्यासाठी स्मार्ट दृष्टिकोन तयार होणे गरजेचे आहे, असे मत नेदरलँड येथील तज्ज्ञ बर्ट सॅटिजिन यांनी वालचंद महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय परिषदेत व्यक्त केले. वालचंद महाविद्यालयातील दोनदिवसीय पर्यावरण व स्थापत्यविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप रविवारी झाला, यावेळी सॅटिजिन बोलत होते. ते म्हणाले की, भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशात जलव्यवस्थापनाची समस्या अधिक गंभीर आहे. नेदरलँडला ओला दुष्काळ सतावत असताना, भारतासारख्या देशात दुष्काळाची स्थिती आहे. जागतिक तापमानवाढ, समुद्राच्या पातळीतील वाढ, रासायनिक वायूंचे वाढते उत्सर्जन... अशी अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. या प्रश्नांची उकल स्थापत्य अभियंते आपणास देऊ शकतात. दूरदृष्टी आणि धोरणात्मक नियोजन असायला हवे. आंतरराष्ट्रीय सहकार्यसुद्धा या नियोजनात महत्त्वाचे आहे.नेदरलँडचे तज्ज्ञ थिस एडलकुर्ट म्हणाले की, आमच्या देशातील ‘अ‍ॅट्रेक्ट’ हे नव्याने विकसित होणारे शहर आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाचा वापर होतो. त्यामुळे कार्बन डायॉक्साईडसारख्या वायूंचे उत्सर्जन वाढत आहे. हे टाळण्यासाठी शहरात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. पाणी झिरपण्यासाठी, पावसाचे पाणी साठविण्यासाठी पुरेशी जागा आणि मजबूत रचना बनविली जात आहे. भारतीय शहरांमध्येही अशा उपायांची अंमलबजावणी केली जाऊ शकते. मुंबईचे उमेश धारगळकर म्हणाले की, भारत ही २०५० मध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, मात्र त्यासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित पुरोगामी समाजाची गरज आहे. प्रमुख शहरांमध्ये वीज, पाणी, सांडपाणी व कचरा यासारख्या सुविधांचा पुनर्विकास केला पाहिजे.परिषदेत रविवारी हैदराबाद येथील बी. उमाशंकर, बेंगलोरचे डॉ. के. आर. सुरेश, एस. रघुनाथ, विनोद होसूर या तज्ज्ञ संशोधकांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)