शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

छोट्या बाबर टोळीचा पोलिसांवर हल्ला; सहाजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:10 IST

सांगली : ‘मोक्का’ कायद्याखाली अटकेतील गुंड छोट्या ऊर्फ विक्रांत बाबर यास न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याला भेटण्यास व मावा, गुटखा ...

सांगली : ‘मोक्का’ कायद्याखाली अटकेतील गुंड छोट्या ऊर्फ विक्रांत बाबर यास न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याला भेटण्यास व मावा, गुटखा देण्यासाठी आलेल्या साथीदारांना पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर संतप्त झालेल्या साथीदारांनी पोलिसांच्या मोटारीवर जोरदार दगडफेक केली.विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक ते धामणी रस्त्यावर भरदिवसा ही थरारक घटना घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.अटक केलेल्यांमध्ये किरण श्रीरंग लोखंडे (वय २४), राहुल रमेश बाबर (२८, रा. विठ्ठलनगर, कोल्हापूर रस्ता), मेघ:श्याम ऊर्फ मोट्या अशोक जाधव (२५, गजानन कॉलनी, दत्त मंदिरजवळ, शामरावनगर,शुभम कुमार शिकलगार (२२, कुदळे प्लॉट, रमामातानगर), धनंजय शैलेश भोसले (२१, दत्त कॉलनी, शामरावनगर), सुजित सुनील कांबळे (२४, शामरावनगर, सांगली) यांचा समावेश आहे.छोट्या बाबर हा सराईत गुन्हेगार आहे. खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी, दहशत माजविणे, बेकायदा हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. गतवर्षी त्याच्यासह टोळीतील चौघांविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बाबर टोळीला कोल्हापुरातील कळंबा कारागृहात ठेवण्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी छोट्याविरुद्ध दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी होती. यासाठी सांगली पोलीस मुख्यालयातील पथकाची छोट्या बाबरला न्यायालयात हजर करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती.पथकाने कळंबा कारागृहातून छोट्या बाबरला ताब्यात घेतले. त्याला घेऊन पथक दुपारी सांगलीत दाखल झाले. छोट्याला न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या मोटारीत ठेवले होते. त्याच्या साथीदारांनी त्यास भेटण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला मावा, गुटखा, तंबाखूची पुडीही देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी संशयितांना फैलावर घेत तेथून हाकलून लावले. न्यायालयीन सुनावणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पथक छोट्याला घेऊन कळंब्याकडे रवाना झाले. विश्रामबागच्या स्फूर्ती चौकातून पथक पुढे आल्यानंतर धामणी रस्त्यावर छोट्याचे साथीदार दबा धरुन बसले होते. अचानक ते मोटारीच्या आडवे आले व त्यांनी मोटार थांबविण्याचा प्रयत्न केला. पण पथकाने मोटार न थांबविता भरधाव वेगाने नेली. त्यावेळी साथीदारांनी मोटारीवर जोरदार दगडफेक केली. पोलिसांनी दोन-तीन दिवसात दगडफेक करणाऱ्या संशयितांची नावे निष्पन्न केली. त्यानंतर संशयितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. पोलीस नाईक रवींद्र पाटील यांनी फिर्याद दिली आहे.