शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी धारकांची दिवाळी यंदाही रस्त्यावरच!

By admin | Updated: October 25, 2016 01:03 IST

घरकुलांचे स्वप्न भंगले : महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनेच

सांगली : गोरगरीब झोपडपट्टी धारकांना पक्क्या घरांचे स्वप्न दाखवत सहा वर्षापूर्वी महापालिकेने घरकुल योजना हाती घेतली. त्यातील बाल हनुमान घरकुल योजनेचे काम पूर्णही झाले. पण या घरकुलांचा ताबा देण्यात दिरंगाई झाल्याने यंदाही १७६ कुटुंबांना दिवाळी रस्त्यावरच साजरी करावी लागणार आहे. दिवाळीपूर्वी घरकुले ताब्यात देऊ, अशी भीमगर्जना महापौर हारूण शिकलगार व आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी केली होती. त्यात आता विधानपरिषदेच्या आचारसंहितेमुळे किमान महिनाभर तरी ही प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. महापालिकेने शहरातील चार हजार झोपडपट्टी धारकांना पक्की घरे देण्यासाठी केंद्र शासनाच्या एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत प्रस्ताव सादर केला. केंद्र शासनाने ९८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली. चार हजारपैकी १४०० घरकुलांचे काम हाती घेण्यात आले. इतर ठिकाणी झोपड्या हटविण्यास विरोध झाल्याने, महापालिकेने तेथील घरकुलांचे कामच रद्द केले. सांगलीतील बाल हनुमान, धोत्रेआबा, संजयनगर पत्रा चाळ, मिरजेतील इंदिरानगर, संजय गांधीनगर येथील झोपड्या हटवून घरकुलांचे काम सुरू करण्यात आले. तेथील झोपडपट्टी धारकांचे रस्त्याच्या कडेला पुनर्वसन करण्यात आले. त्यांच्यासाठी पाणी, विजेची व्यवस्था करण्यात आली. त्यावर दरवर्षी महापालिकेला एक ते सव्वाकोटीचा खर्च करावा लागत आहे. यापैकी बाल हनुमान घरकुल योजनेतील १७६ घरांचे काम पूर्ण झाले आहे. गत महिन्यात आयुक्त रवींद्र खेबूडकर, महापौर हारूण शिकलगार यांनी झोपडपट्टी धारकांची भेट घेऊन, दिवाळीपूर्वी घरांचा ताबा देण्याचे आश्वासन त्यांना दिले. त्यामुळे गेली सहा वर्षे रस्त्यावर जीवन कंठणाऱ्या झोपडपट्टी धारकांना यंदाची दिवाळी पक्क्या घरात साजरी होईल, अशी आशा लागली. पण त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. महापौरांनी तर घरकुलांच्या सोडतीची तारीखही जाहीर केली होती. पण प्रशासनाच्या तिरक्या चालीमुळे सोडतीची तारीख ओलांडली तरी त्यावर निर्णय होऊ शकला नाही. झोपडपट्टी धारकांनी आपल्या हिश्श्याची रक्कम महापालिकेकडे जमा केली आहे. तरीही त्यांना ताबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे यंदाची दिवाळीही या १७६ झोपडपट्टी धारकांना रस्त्यावरच साजरी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी) आचारसंहिता आली आड झोपडपट्टी धारकांना घरकुले ताब्यात देण्यात अडथळ्यांची शर्यत करावी लागत आहे. यापूर्वी प्रशासनाच्या दिरंगाईमुळे घरकुलांचे काम संथगतीने झाले. आता घरकुले पूर्ण झाली असतानाही, त्यांचा ताबा मिळत नाही. पालिकेतील महापौर व इतर पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करुनही लाल फितीच्या कारभाराचा फटका बसला आहे. आता तर विधानपरिषदेची आचारसंहिता लागू झाल्याने घरकुलांची सोडत काढता येणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतरच घरकुलांचा निर्णय होणार आहे.