शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्याचे बांधकाम थांबविले

By admin | Updated: December 17, 2015 22:56 IST

मिरजेत महापौरांची अचानक भेट : ठेकेदाराचे विनापरवाना काम

मिरज : महापौर विवेक कांबळे यांनी गुरुवारी मिरजेत महापालिकेच्या बेडग रस्त्यावरील कत्तलखान्यास भेट देऊन, ठेकेदाराने सुरू केलेले विनापरवाना बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले. जनावरांची कत्तल करणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या नोंदी नसल्याने, ठेकेदाराच्या कार्यालयास महापौरांनी टाळे ठोकले. महापालिकेचा बेडग रस्त्यावरील कत्तलखाना ठेकेदाराकडे चालविण्यास देण्यात आला आहे. कत्तलखान्यात दररोज मोठ्या संख्येने जनावरांची कत्तल करण्यात येते. कत्तलखान्यातील नियमबाह्य कारभाराबाबत तक्रारींमुळे महापौर कांबळे यांनी गुरुवारी सकाळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह अचानक तेथे भेट देऊन पाहणी केली. कत्तलखान्यात जनावरांच्या कातड्याचा साठा करण्यासाठी गोदामाचे बांधकाम करण्यात येत असल्याचे दिसून आले. गोदाम बांधकाम परवानगीसाठी ठेकेदाराने महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र बांधकाम परवानगी अद्याप मिळाली नसतानाही बांधकाम सुरू करण्यात आल्याने महापौरांनी विनापरवाना बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले. कत्तलखान्यात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना हातमोजे, बूट अशा कोणत्याही सुविधा नसल्याने महापौरांनी ठेकेदारास जाब विचारला. ठेकेदाराने परप्रांतीय कामगारांच्या नोंदी व कागदपत्रे ठेवली नसल्याने महापौरांनी ठेकेदाराच्या कार्यालयास टाळे ठोकले. कत्तलखान्यात आढळलेल्या त्रुटींची ठेकेदाराकडून पूर्तता करण्याच्या सूचना महापौरांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. (वार्ताहर)कचरा वर्गीकरण यंत्रकत्तलखान्यालगत असलेल्या कचरा डेपोत २७ लाख रुपये किमतीचे कचरा वर्गीकरण करणारे यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्राद्वारे ओला, सुका व प्लॅस्टिक असे कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करता येणार आहे. यासाठी कचरा डेपोत खत प्रकल्प उभारण्यात येत असून अंतर्गत रस्ते करण्यात येत आहेत. हरित न्यायालयाच्या आदेशामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था करण्यात येत असून, महापौरांनी कचरा वर्गीकरण करणाऱ्या यंत्राची पाहणी केली.