संख : करजगी (ता.जत) येथील बोर नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करत असताना धाड टाकून तीन जेसीबी, दोन ट्रॅक्टर, एक डंपर पकडून कारवाई केली. ही या वर्षातील सर्वांत मोठी कार्यवाही केली आहे. प्रांताधिकारी व जतचे तहसीलदार यांच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली.
पूर्व भागातील बोर नदीचे पात्र ६४ किलोमीटर अंतर आहे. वाळू तस्करीचे केंद्र आहे. वाळू उपसा होत असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या काळ्या सोन्याची तस्कर सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाचे अधिकारी कामात गुंतले आहेत. संख अपर तहसीलदार कार्यालयाच्या आशीर्वादाने व निवडणुकीचा फायदा घेत करजगी व भिवर्गी येथील बोर नदी पात्रात गेल्या महिनाभरापासून अवैध वाळू उपसा सुरू होता.
रात्री १२ ते १ पहाटे १ वाजता प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, उमदीचे उपनिरीक्षक नामदेव दाडंगे यांनी करजगी येथील बोर नदी पात्रात धाड टाकली. पथकाला पाहताचा वाळू तस्करांनी वाहने तेथेच सोडून पळ काढला.
अवैध वाळू उपसा करत असताना तीन जेसीबी, एक डंपर, दोन ट्रॅक्टर असे सहा वाहनांवर कारवाई केली. पंचनामा, जप्त करून संख येथील अपर तहसील कार्यालयात वाहन जमा करण्यात आली आहेत.
संख मंडळ अधिकारी मनहोर कोळी, तलाठी राजेश चाचे, एन. डी. सागोलकर, बी. एस. जगताप, एस. डी. बागेळी, गणेश पवार, निकील पाटील, कोतवाल कामराज कोळी, इंद्रजित गोदे, विक्रम गोदे यांनी कारवाई केली.
कोट
तालुक्यातील वाळू उपसावर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार पूर्व भागातील भिवर्गी-करजगी दरम्यान बोर नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची सूत्राकडून माहिती मिळाली होती. धाड टाकून सहा वाहने जप्त केली आहेत. त्यांच्यावर गौण खनिज अधिनियमअंर्तगत दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे.
-सचिन पाटील,
तहसीलदार, जत
फोटो ओळ :
१) करजगी (ता. जत) येथील बोर नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करत असताना धाड टाकून जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर पकडून कारवाई केली.
२) करजगी (ता.जत) येथील बोर नदीत वाळू उपसा करणारे जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर सोबत प्रांताधिकारी प्रशांत आवटे, जतचे तहसीलदार सचिन पाटील यांचे पथक, उमदीचे उपनिरीक्षक नामदेव दाडंगे उपस्थित होते.