शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
5
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
6
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
7
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
9
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
10
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
12
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
13
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
14
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
15
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
16
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
17
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
18
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
19
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
20
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

गिरगावमध्ये बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यात सहा जखमी

By admin | Updated: June 14, 2014 01:34 IST

तिघांची प्रकृती गंभीर

जत : जत तालुक्यातील गिरगाव येथे आज, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास शिकारीसाठी गेलेले सहाजण बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींना विजापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी बेंदूर झाल्याने आज, शुक्रवारी करीसाठी गिरगावमधील रावसाहेब चव्हाण, महादेव सबकाळे, महेश काटे, दत्ता चव्हाण, चंद्रकांत वाघमारे, मुबारक मुल्ला हे सहाजण सशाची शिकारीकरिता गेले. गिरगाव-लवंगा रस्त्यावरील लक्ष्मण चव्हाण यांच्या दोन एकर क्षेत्रातील उसाच्या शेतात ते चारही बाजूने वेगवेगळे शिरले. त्यावेळी बिबट्यासदृश प्राण्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले. या लोकांनी शेताला चारही बाजूने वेढा घातला. त्यामुळे सैरभैर झालेल्या या प्राण्याने तेथून पळ काढला. त्यानंतर तो प्राणी तेथेच असणाऱ्या एका विहिरीत पडला. लोकांनी विहिरीकडे धाव घेताच, त्या प्राण्याने पुन्हा उसाच्या शेताकडे पलायन केले. तो प्राणी अद्यापही त्या शेतात असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी वन विभागाचे एक पथक गिरगावकडे रवाना झाले आहे. बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यामुळे गिरगाव, लवंगा यासह पूर्व भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)