शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी वर्ग न केल्यास बँकेच्या दारात ठिय्या आंदोलन : संदीप राजोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST

भिलवडी : शासनाने सामूहिक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची रक्कम बँकेने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अन्यथा जिल्हा बँकेच्या ...

भिलवडी : शासनाने सामूहिक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची रक्कम बँकेने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अन्यथा जिल्हा बँकेच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, महापुरामुळे व अतिवृष्टीमळे शेतीचे मोठे नुकसान होऊन शेतकरी उद‌्ध्वस्त झाला. तत्कालीन सरकारने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून कर्जमाफीची घोषणा केली होती. सामूहिक खाती असणाऱ्या म्हणजे ज्यांची खातेफोड नसल्याने सर्व्हे व गट नंबर एकच असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता. जिल्हा बँक व विकास सोसायट्यांनी ‘कर्जमाफी हवी असेल तर व राज्य आणि केंद्र शासनाकडून चार टक्के व्याजमाफी हवी असेल, तर व्याजासह पीक कर्ज तात्काळ भरा’, असे सांगितले. शेतकऱ्यांनी कर्ज खाते थकीत जाऊ नये म्हणून उधार, उसनवार किंवा खासगी सावकारांकडून कर्ज काढून कर्जाची परतफेड केली. यानंतर बँकेने पीक कर्ज दिले. त्याच्या परतफेडीस अजून सात-आठ महिन्यांचा कालावधी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाकडे पाठपुरावा करून सामूहिक खाती असणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला. ही रक्कम शासनाने दिली आहे, पण बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता, त्यांची कोणतीही संमती न देता ही रक्कम पीक कर्ज व इतर कर्जास परस्पर जमा करून घेत आहेत. याबाबत बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील व व्यवस्थापकांना भेटणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर बँक पैसे जमा करीत नाही, तोपर्यंत जिल्हा बँकेच्या दारात स्वाभिमानी शेतकरी संघटना ठिय्या आंदोलन करणार आहोत.