शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील वाळू तस्कर होऊ लागले शिरजोर

By admin | Updated: December 12, 2015 00:15 IST

प्रशासनात मतभिन्नता : चोरट्या वाळू वाहतुकीवर अंकुश कोणाचा?; तलाठी, कोतवाल ‘लक्ष्य’

सांगली : घटना क्रमांक एक : जतचे तहसीलदार अभिजित पाटील पथकासह संख येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी थांबले असताना, वाळू वाहतूकदारांकडून पथकाचे वाहन ढकलण्याचा झालेला प्रयत्न... घटना क्रमांक दोन : वाळू वाहतूक रोखण्यासाठी करंजेत थांबलेल्या तलाठी, कोतवालावर वाळू तस्करांनी केलेला हल्ला... घटना क्रमांक तीन : उंबरगाव (ता. आटपाडी) येथे वाळू साठ्यावर कारवाईवेळी मंडल अधिकारी व तलाठ्यांच्या पथकावर हल्ला. आठवड्यात जिल्ह्यात वाळू तस्करांकडून झालेल्या पथकावरील हल्ल्यांनी पथकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात वाळू तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने जोरदार मोहीम राबविली आहे. या मोहिमेला प्रतिसादही मिळताना दिसत असताना, गेल्या आठवड्यापासून महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्यांनी पथकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पथकात पोलीस नसल्याचा पुरेपूर अंदाज आलेल्या वाळू तस्करांनी आता थेट पथकालाच लक्ष्य केल्याने, जिल्ह्यात सुरू असलेली वाळू तस्करांविरोधातील मोहीम बारगळण्याची शक्यता आहे. वाळू तस्करांनी आता पथकाला न जुमानता हल्ल्यांचे सत्र राबविल्याने, महसूल विभागाच्या पथकाला पुरेसे संरक्षण व पथकात पोलीस प्रशासनातील व्यक्तींचा समावेश आवश्यक आहे. पथकावर हल्ला करुन दहशत निर्माण करु पाहणाऱ्या वाळू माफियांना नक्की बळ कोणाचे मिळत आहे, याच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी केल्यास, वाळू माफियांची दहशत मोडीत काढण्यास मदत होणार आहे. अवैध वाळूची वाहतूक रात्रीच होत असल्याने पथकाला संरक्षण गरजेचे बनले आहे. शासनाच्या नव्या आदेशानुसार जिल्हास्तरावर अवैध गौणखनिजाची वाहतूक व उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस व आरटीओ यांची संयुक्त समिती गठित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य असणार आहेत, तर जिल्हा खणीकर्म अधिकारी या समितीचे सचिव असणार आहेत. जिल्ह्यात अजून या समितीची स्थापना झालेली नसल्याने महसूल विभागाच्या अवैध वाळू वाहतुकीला आळा बसण्यासाठी या पथकाची निर्मिती आवश्यक आहे. (प्रतिनिधी)महसूल, पोलीस, आरटीओ संयुक्त पथकाची प्रतीक्षाशासनाच्या नवीन आदेशानुसार अवैध गौण खनिजाची वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल पोलीस व आरटीओंच्या संयुक्त पथकाची निर्मिती करण्यात येणार आहे. पथकात पोलिसांचा समावेश असल्यास वाळू तस्करांवर जरब बसेल व आरटीओंच्या समावेशाने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे सोयीचे जाईल, हे या संयुक्त पथकाचे धोरण असल्याने जिल्ह्यात या संयुक्त समितीची स्थापन होण्याची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूकदारांकडून हल्ल्याच्या घटना घडत असताना या विषयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते ‘नॉट रिचेबल’होते. पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याबाबत आधिक माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ असे सांगितले.