शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सिंगल बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST

तासगाव : तासगाव शहरासह तालुक्यात अवैध व्यवसायांवर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे. मटका व्यवसाय, अवैध दारू वाहतूक, भुरट्या चोऱ्या ...

तासगाव : तासगाव शहरासह तालुक्यात अवैध व्यवसायांवर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे. मटका व्यवसाय, अवैध दारू वाहतूक, भुरट्या चोऱ्या अशा घटनांमुळे गुन्हेगारी वृत्ती वाढू लागली आहे. पोलिसांनी चाप लावण्याची मागणी होत आहे.

-------------------------

पलूसमध्ये पार्किंग व्यवस्थेची मागणी

पलूस : पलूस शहरातील विविध भागामध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक मिळेल त्या जागी वाहने लावत आहेत. याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. तहसीलदार कार्यालय परिसरात ही समस्या अधिक जाणवून येते. यामुळे शहरातील पार्किंग व्यवस्थेवर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

--------------------

अंकलखोप-नागठाणे रस्त्याचे काम सुरू

अंकलखोप : पलूस तालुक्यातील अंकलखोप-नागठाणे रस्त्याची दुरवस्था झाली होती. यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती. रस्ता मंजूर असूनही ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत होता. याबाबत नागरिकांनी व माध्यमांनी वारंवार पाठपुरावा केला होता. याची दखल घेत सध्या या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

-------------------

ऑनलाईन व्यवहारात दक्षता गरजेची

सांगली : ऑनलाईन व्यवहारामध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: फोनवरून एटीएमसंदर्भात माहिती घेऊन नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यामुळे नागरिकांनी ऑनलाईन व्यवहारांबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे.

--------------

आठवडी बाजारांमध्ये स्वच्छतेची मागणी

आटपाडी : आटपाडीसह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये आठवडी बाजार सुरू झाले आहेत. मात्र या आठवडी बाजारांमध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. यामुळे स्वच्छतेबाबत ग्रामस्थ, व्यापारी व ग्रामपंचायत प्रशासनाने दक्षता घेण्याची मागणी होत आहे.

-----------------------------------

रब्बी हंगामात खतांची मागणी वाढली

मांजर्डे : मांजर्डे (ता. तासगाव) परिसरात रब्बी हंगामातील पिके जोमात आली आहेत. यंदा परिसरात चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली होती. पिके चांगली असल्याने शेतकरी वर्गातून खतांची मागणी वाढली आहे. सध्या कृषी सेवा दुकानांमध्ये खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.

------------------------------

आमराई ते कॉलेज कॉर्नर मार्गावर खड्डे

सांगली : शहरातील आमराई ते काॅलेज कॉर्नर या मार्गावरील एसटी पिकअप शेडजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावरुन येणा-जाणाऱ्या वाहनचालकांना याचा त्रास होत आहे. महापालिका प्रशासनाने शहरातील इतर मार्गावरील खड्डे बुजवले; पण या मार्गाकडे दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी खड्डे मुजविण्याची मागणी होत आहे.

--------------

विद्यानगरमध्ये रस्त्याचे काम गतीने

सांगली : सांगली शहरातील विद्यानगरमधील गल्ली क्रमांक सहामध्ये सध्या रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. या रस्त्याची मागणी गत अनेक दिवसांपासून केली जात होती. नागरिकांनी, स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा केल्याने कामास गती आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.