शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रातील सिंघम सुमित गरुड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:24 IST

सांगली : सांगलीच्या मातीत घडलेल्या कर्तृत्ववान माणसांनी आपल्या कामाचा ठसा नेहमीच उमटविला आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रात असो अथवा ...

सांगली : सांगलीच्या मातीत घडलेल्या कर्तृत्ववान माणसांनी आपल्या कामाचा ठसा नेहमीच उमटविला आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रात असो अथवा कोणत्याही प्रदेशात. आपलं वेगळपण या मातीने नेहमीच जपले आणि ते वेगळेपण इथल्या माणसांमध्ये रुजविले आहे. याची साक्ष मिळते, ती इस्लामपूर येथील मूळचे रहिवासी असणारे व सध्या आंध्र प्रदेशमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुमित गरुड यांच्यामुळे. एका बाजूला आपल्या अधिकाराने गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी धडाकेबाज सिंघम अधिकारी, तर दुसऱ्या बाजूला आपल्या सहकाऱ्यांविषयी अनोखे उपक्रम राबवून जबाबदार नेतृत्वाची भूमिका बजाविणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख बनली आहे.

दहावीत ९५.०६ टक्के गुणांनी कोल्हापूर विभागात प्रथम; बारावीत ९६ टक्के गुणांसह बोर्डात सहावा; मुंबई विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण आणि २०१५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नांत यश संपादन करीत आयपीएस होण्याचा मान. असा हा शैक्षणिक प्रवास संपल्यानंतर सुमित गरुड यांनी आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेला आंध्र प्रदेशमधून सुरुवात केली. विजयनगरम्, विशाखापट्टणम्‌ येथे सेवा बजावत सध्या ते काकीनाडा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये अवैध वाळू उपसा आणि दारू व्यवसायाला चाप लावण्यासाठी तेथील सरकारने मोजक्याच अधिकाऱ्यांवर विशेष मोहीम राबविली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये सुमित गरुड यांची निवड करण्यात आली आहे. धडाकेबाज कामगिरी, रोखठोक भूमिका यामुळे गरुड यांनी आंध्र प्रदेश पोलीस प्रशासनात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यामुळेच या मोहिमेमध्ये त्यांना संधी मिळाली आहे. गत काही दिवसांमध्ये त्यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये स्वत:ची जरब निर्माण केली आहे.

या कामगिरीबरोबरच त्यांनी पोलीस प्रशासनातील महिला कर्मचाऱ्यांसाठीही विशेष उपक्रम राबवत, त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम केले आहे. ‘वनिता वनी’ या नावाने हा उपक्रम असून, याअंतर्गत महिला कर्मचाऱ्यांच्या कामातील विविध समस्या, काैटुंबिक अडचणी, शारीरिक समस्या याविषयी मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यावर भर दिला आहे. या माध्यमातून त्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठीही पाऊल उचलले आहे.