शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सिध्दनाथ तलाव पाच वर्षाने भरला

By admin | Updated: September 1, 2014 23:08 IST

दरीबडचीत समाधान : तीन गावाच्या शेतीला पाणी शक्य

दरीबडची : मान्सूनच्या दमदार पावसाने सिध्दनाथ (ता. जत) येथील तलाव पाच वर्षांनंतर भरले आहे. तलाव २००९ मध्ये आॅक्टोबर महिन्यामध्ये भरले होते. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पूर्व भागातील दरीबडची, सिध्दनाथ, येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच सिध्दनाथ, दरीबडची, जालिहाळ खुर्द या तीन गावांतील शेतीला पाणीपुरवठा होणार आहे.पूर्व भागातील सिध्दनाथ येथील लघु पाटबंधारे तलाव १९७२ मध्ये बांधण्यात आला आहे. तलावाची साठवण क्षमता १०२.७३ द.ल.घ.फू.आहे. तलावापासून आठ कि. मी. लांबीचा कालवा खोदण्यात आला आहे. तलावापासून दोन कि. मी. कालव्याचे अस्तरीकरण झाले आहे. कालव्याच्या सहाय्याने सिध्दनाथ जालिहाळ खुर्द, दरीबडची या तीन गावातील जमीन ओलिताखाली येते. पाणी व्यवस्थापन विठ्ठल पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून केले जाते. या पाण्यामुळे ८३० हेक्टर जमीन ओलिताखाली येते.सध्या तलाव भरून सांडव्यातून पाणी वाहून जात आहे. तलाव भरल्याने बोर ओढ्यावरील जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी, खंडनाळ या गावांना त्याचा फायदा होतो. तलावामुळे परिसरातील भूमिगत पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. तलाव परिसर क्षेत्रामध्ये द्राक्षे, डाळिंब, फळबागांचे प्रमाण अधिक आहे. कूपनलिका, विहिरींना पाणी पातळी वाढते. तलावात सिध्दनाथ गावची भारत निर्माण योजनेची विंधन विहीर व दरीबडची जलस्वराज्य योजनांची विंधन विहीर खोदण्यात आली आहे. सध्या तलाव भरल्याने दोन्ही गावांचा पाणीप्रश्न वर्षभराचा मिटला आहे. तसेच तलाव भरल्यामुळे बोर नदीच्या ओढा पात्रात जानेवारी महिन्यापर्यंत पाणी राहणार आहे. जनावरांच्या पाण्याचा विशेषत: शेळ््या-मेंढ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. (वार्ताहर)