लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्वेता तात्यासाहेब बामणे ही शिवाजी विद्यापीठाने मार्च-एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बी. बी. ए. पदवी परीक्षेत गुणवत्ता यादीत प्रथम आली.
प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळकर याविषयी माहिती देताना म्हणाले की, श्वेता बामणे हिला ८५.५७ टक्के गुण मिळाले असून, ती शिवाजी विद्यापीठाने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत बी. बी. ए. पदवी परीक्षेत प्रथम आली. त्यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडली असून शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्याची या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची परंपरा तिने पुढे चालवली आहे. याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने बी.बी.ए. अंतिम वर्ष परीक्षेमध्ये सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दिले जाणारे नेमिनाथ दादा शेटे स्मृती पारितोषिक तिला प्राप्त झाले. याबद्दल महाविद्यालयास तिचा सार्थ अभिमान आहे.
प्रा. डी. ए. पाटील (विभागप्रमुख), प्रा. संजय पवार, प्रा. सीमा पाटील, प्रा. सुचिता वाळवेकर, प्रा. संदीप माने, प्रा. सुप्रिया पाटील, प्रा. नेहा यादव यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. शामराव पाटील, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांनी तिचे अभिनंदन केले.