शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात एकच जल्लोष; तरुणाई रस्त्यावर

By admin | Updated: June 5, 2017 01:26 IST

कोल्हापुरात एकच जल्लोष; तरुणाई रस्त्यावर

कोल्हापूर : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा रविवारी झालेल्या साखळी सामन्यात पराभव केला. या विजयानंतर कोल्हापुरातील शिवाजी चौकात रात्री क्रिकेटप्रेमींनी फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शिवाजी चौक, मिरजकर तिकटी, सोन्या मारुती चौक, साकोली कॉर्नर, अकबर मोहल्ला, क्रशर चौक, आदी चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना झाला. यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४८ षटकांत ३ बाद ३१९ धावा केल्या. ३१९ धावांचे आव्हान घेऊन खेळणाऱ्या पाकिस्तानसमोर मोठ्या लक्ष्यासह पावसाचाही व्यत्यय आला. सामना उशिरा सुरू झाल्याने पाकिस्तानसमोर डकवर्थ लुईसच्या नियमाप्रमाणे कमी षटकांत जादा धावांचे आव्हान ठेवण्यात आले. पाकिस्तानचे एक एक फलंदाज जसजसे पॅव्हेलियनकडे परतू लागले तसा कोल्हापूरच्या तरुणाईला जोर चढू लागला. यात अनेक तरुणांनी सायलेन्सर काढलेल्या मोटारसायकलवरून शहराच्या मुख्य रस्त्यावरून फेरफटका मारण्यास सुरुवात केली. रात्री साडेअकरानंतर भारताने सामना जिंकल्यानंतर शिवाजी चौक येथे तरुणांनी एकच जल्लोष केला. यावेळी गाड्यांचे सायलेन्सर काढलेले तरुण भारताच्या विजयाच्या घोषणा देत फिरत होते. गुजरी, शिवाजी पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, शनिवार पेठ, मंगळवार पेठ, सानेगुरुजी, आदी ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी युवकांच्या हाती तिरंगा ध्वज होता. के.एम.टी बसथांब्याचे छत कोसळलेशिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यासाठी युवकांची गर्दी झाल्यानंतर या गर्दीचे मोबाईल चित्रीकरण करण्यासाठी काही युवक के.एम.टी बसथांब्यावर चढले. पत्र्यावर जादा भार झाल्यानंतर पत्र्यासह युवक कोसळले. त्यात पाचजण जखमी झाले. जखमी झालेल्या युवकांना उपस्थितांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.