शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

एसटीच्या दारी कर्मचाऱ्यांची कमतरता भारी...

By admin | Updated: April 28, 2015 00:18 IST

वाहक-चालकांवर ताण : जिल्ह्यात चालक, वाहक, कर्मचाऱ्यांची ११७४ पदे भरण्याची गरज

नरेंद्र रानडे- सांगली -‘प्रवाशांच्या सोयीसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन गावोगावी धावणाऱ्या सांगलीच्या एसटी विभागात सध्या तब्बल ११७४ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मागील काही महिन्यांपासून ही परिस्थिती कायम असतानाही, अतिरिक्त ताण सहन करुन वाहक - चालक, प्रवाशांना त्रास नको, या एकाच हेतूने संपाचे हत्यार न उपसता कार्यरत आहेत. सध्या सुट्टीचा कालावधी असल्याने आणि अपुऱ्या संख्येमुळे कित्येक कर्मचारी दिवसातील १५ तासांहून अधिक काळ सेवा बजावत आहेत. अतिरिक्त ताणामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी तातडीने वाहक - चालक यांची भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. एसटीसाठी वर्षातील सुट्टीचा कालावधी हा आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठीचा उत्तम काळ असतो. सध्या १५ एप्रिल ते १५ जून २०१५ हा कार्यकाल प्रवासी वाढीचा असल्याचे विभागाने जाहीर केले आहे. यामध्ये एसटीचे उत्पन्न वाढत असल्याने साहजिकच कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडू नये याची काळजी महामंडळाने घेतली पाहिजे. नेमक्या त्याच मुद्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सांगली विभागात दहा डेपो असून त्यामध्ये ९०७ एसटी आहेत. त्यातील बहुतांशी एसटीचा प्रवास सुमारे नऊ लाख कि.मी. झाला आहे. जुन्या नियमानुसार दहा लाख कि.मी. प्रवास झालेल्या एसटी गाड्या बदलणे गरजेचे आहे. तसेच नवीन नियमानुसार ही मर्यादा बारा लाख कि.मी. आहे. आताच काही एसटी गाड्या खराब होण्याच्या मार्गावर आहेत. साहजिकच नजीकच्या काळात बहुतांशी एसटीश बदलणे क्रमप्राप्त आहे. महामंडळाने केवळ तीस नवीन एसटी सांगली आगारात दाखल केल्या आहेत, तर कामगार संघटनांची, अजून दोनशे एसटी गाड्या मिळाव्यात अशी मागणी आहे. दिवसेंदिवस प्रवाशांमध्ये वाढ होत असल्याने पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी, शेगाव, नांदेड, कोल्हापूर आदी ठिकाणी जाण्याकरिता एसटीच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. परंतु वाहक - चालकांची संख्या मर्यादित असल्याने महामंडळाकडून त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे जादा काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे. वास्तविक दिवसातून आठ तासच काम करण्याचा नियम असताना, सध्या अपुरे असलेले वाहक - चालक हे दिवसातून १५ तासाहून अधिक काळ काम करीत आहेत. या दोन महिन्याच्या काळात कोणाला सुट्टी हवी असल्यास, ती देण्यासही टाळाटाळ करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. खासगी प्रवासी बसेसशी स्पर्धा करण्याकरिता प्रवाशांना लवकरात लवकर इच्छितस्थळी पोहोचवणे गरजेचे आहे. परंतु स्पिड लॉक केल्यामुळे याला मर्यादा येत आहेत. याकरिता स्पिड लॉक काढण्याची देखील कर्मचाऱ्यांची मागील दहा वर्षापासूनची मागणी आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांकरिता आवश्यक असणाऱ्या रेस्ट रुममध्ये देखील आवश्यक असणाऱ्या सुविधा नाहीत. महिलांसाठी नवीन रेस्ट हाऊस बांधण्यासाठी एसटी महामंडळाने दहा लाख रुपये मंजूर केले असले तरी, मनपाने बांधकाम परवाना न दिल्याने ते काम रखडले आहे. यामुळे महिलांची गैरसोय होत आहे. सध्या तातडीने एसटीमध्ये वाहक - चालक आणि कार्यशाळा कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविल्यास कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या एसटी चालकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याची गरज आहे.- बिराज साळुंखे, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना सांगली. सांगली विभागात महिला कार्यरत असूनही त्यांच्यासाठी रेस्ट रुममध्ये आवश्यक सुविधा नाहीत. बसस्थानकापासून ते काही अंतरावर असल्याने रात्रीच्या वेळी त्याचा उपयोग होत नाही. प्रस्तावित रेस्ट हाऊस तातडीने झाल्यास महिला कर्मचाऱ्यांची सुविधा होणार आहे.- रोहिणी सबनीस, वाहतूक नियंत्रक, सांगली बसस्थानक