शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

मिरजेत दुकान फोडून पाच लाख लंपास

By admin | Updated: June 15, 2014 00:22 IST

भरवस्तीतील घटना : पोलिसांना आव्हान

मिरज : येथील उदगाव वेस परिसरातील भरवस्तीतील दुकान फोडून चोरट्यांनी पाच लाखांची रोकड लंपास केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. माहीतगार व्यक्तीनेच चोरी केली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.मिरजेतील उदगाव वेस येथील ज्ञानगिरी मठासमोर येथे प्रवीण अरुण टोमके यांचे ‘दत्त मंगल सेवा केंद्र’ हे दुकान आहे. कार्यक्रमांसाठी टेबल, खुर्च्या आदी साहित्य भाड्याने देण्याचा टोमके यांचा व्यवसाय आहे. त्यांनी स्वत:च्या एमएच १० एएन ६२५५ क्रमांकाच्या मोटारीची कालच (शुक्रवारी) पाच लाख रुपयांना विक्री केली होती. गाडी विक्रीतून मिळालेले पाच लाख रुपये व स्वत:कडील ३५ हजारांची रक्कम त्यांनी दुकानातील टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवली होती. काल रात्री चोरट्यांनी मागील दरवाजाची कडी काढून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून मुख्य भागात असलेल्या टेबलच्या ड्रॉव्हरमधील ५ लाख ३५ हजाराची रोकड लंपास केली. सकाळी टोमके यांनी दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शहर पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने दुकानामागील बोळातून एसटी बसस्थानकापुढील महात्मा फुले चौकापर्यंत माग काढला. मात्र त्या चौकात श्वान घुटमळले. ठसेतज्ज्ञांना पाचारण करून चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळविण्याचाही प्रयत्न करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुुरू होते. (वार्ताहर)