शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव नगरपंचायत विरोधात शोले स्टाइल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी पाणी संघर्ष समिती व राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी पाणी संघर्ष समिती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी. एस. देशमुख आणि वंचित आघाडीचे जीवन करकटे यांनी कडेगाव कडेगाव तहसीलदार कार्यालयावर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी धाव घेत आंदोलकांना अडवले. यामुळे अनर्थ टळला.

कडेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून विकासकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. शहरात हाय मास्ट लॅम्पचे काम एका कंपनीला दिले आहे. या कामाची सात वर्षांची जबाबदारी कंपनीची असूनदेखील हे लॅम्प बंद अवस्थेत आहेत. यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. बालोद्यानमध्ये खेळणी बसविली आहेत. यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या ठिकाणी सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य आहे. अशाप्रकारे भोंगळ व भ्रष्ट कारभार कडेगाव नगरपंचायतमध्ये सुरू आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका आंदाेलकांनी घेतली.

कडेगाव कार्यालयावरून उडी मारू असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यामुळे आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली. कोणताही अनर्थ घडू नये यासाठी तहसील कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नायब तहसीलदार जयवंत लाड, मुख्याधिकारी कपिल जगताप व पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांनी चर्चा केली. त्यांनतर नायब तहसीलदार जयवंत लाड यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आता आंदोलकांच्या मागणीचे पुढे काय हाेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे जेष्ठ नेते मोहनराव यादव, बाळासाहेब वत्रे, जगदीश महाडिक, वैभव देसाई, रमेश जाधव, संदेश जाधव, परवेज तांबोळी, विराज पवार, शिवसेनेचे राहुल चन्ने, संदीप काटकर, अनिल देसाई आदी उपस्थित होते.

चौकट :

दारूच्या बाटल्यांचा खच आणि खळबळ

आंदोलनावेळी तहसील कार्यालयावर देशी-विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आला. आंदोलक कार्यकर्ते व पोलिसांच्या समक्ष हा प्रकार उघडकीस आला. या धक्कादायक प्रकाराने महसूल विभागासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नायब तहसीलदार जे. एन. लाड यांनी येथील दारूच्या बाटल्या हटवण्याचा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या, तर तहसील कार्यालयावर देशी-विदेशी दारूच्या बाटल्या कुठून आल्या याबाबत उपस्थितासह तालुक्यातील नागरिकांतून तर्क-वितर्कांना उधाण आले हाेते.