शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यादेवी जयंतीनिमित्त शोभायात्रा

By admin | Updated: May 30, 2016 00:51 IST

विविध कार्यक्रमांचे आयोजन : मान्यवरांकडून अभिवादन; पारंपरिक धनगरी ढोलवादनाने मिरवणुकीत रंगत

सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर शहरातील विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तरूणांचा उत्साह आणि पारंपरिक धनगरी वाद्यांच्या गजरात काढण्यात आलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. शहरातील विविध मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात आली. चौका-चौकात शोभायात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त रविवारी स्टेशन चौक येथे सकाळपासून विविध कार्यक्रम पार पडले. यात सकाळी आ. सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते पुतळ््यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेविका संगीता खोत, माजी नगरसेवक सुभाष गोयकर, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गजानन आलदर, संजय यमगर, विनायक रूपनूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळी शहरातील विविध मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. स्टेशन चौक येथून शोभायात्रेस प्रारंभ झाला. धनगरी पारंपरिक वाद्यांच्या गजरामुळे यात्रा लक्षवेधी ठरली. फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक ढोलवादनाबरोबरच लेसर, डॉल्बीच्या साथीने शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत मध्यभागी चांदीच्या रथामध्ये अहिल्यादेवी यांचा पुतळा होता. या सर्व कार्यक्रमास शहरासह परिसरातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कार्यक्रमांचे संयोजन समितीचे अध्यक्ष गजानन आलदर, उपाध्यक्ष संजय यमगर, माजी नगरसेवक सुभाष गोयकर, विनायक रूपनर, धनंजय रूपनर, सुनील वाघमोडे आदींनी केले. सोमवारी व मंगळवारीही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)चार वाजता प्रा. अरूण घोडके यांचे व्याख्यान झाले. यावेळी घोडके यांनी अहिल्यादेवी यांनी समाजसुधारणेसाठी केलेल्या कार्याचा आलेख मांडत, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आजही त्यांचे विचार प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी बापू बिरू वाटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.