शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या गाडीला चिकुर्डेकरांचं वंगण!

By admin | Updated: June 23, 2016 01:45 IST

वाळवा-शिराळा : निवडणुकीत राष्ट्रवादीचा अडसर

अशोक पाटील--  इस्लामपूर --राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. या दोघांनाही शिवेसेनेची साथ आहे. इस्लामपूर मतदारसंघात जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी शिवसेनेला ताकद दिली आहे, तर शिराळा मतदारसंघातील शिवसेनेची बैलगाडी वंगणाअभावी चालेनाशी झाली आहे. आता या गाडीला अभिजित पाटील यांच्या रूपाने वंगण मिळाले आहे, तरीसुध्दा जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीचा अडसर दोन्ही मतदारसंघात राहणार आहे.शिराळ्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र झाल्यास ताकद नेहमीच वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. गत विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपापली ताकद अजमावली. यामध्ये शिवाजीराव नाईक सरस ठरले. तसेच त्यांना मोदी लाटेचाही फायदा झाला. परंतु शिवसेनेची ताकद कोठेही दिसली नाही. याच मतदारसंघातील चिकुर्डेचे माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघातून आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्या पाठीशी स्वाभिमानी संघटना, भाजप व शिवसेनेची ताकद होती. परंतु राष्ट्रवादीपुढे कोणाचे काहीही चालले नाही. इस्लामपूर मतदारसंघात जिल्हाप्रमुख पवार यांची ताकद आहे. पालिकेच्या सभागृहात ते स्वत: निवडून आले आहेत. त्यातच अभिजित पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सध्या इस्लामपुरात आणि परिसरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. नुकताच शिवसेनेचा ५० वा वर्धापनदिनही साजरा करण्यात आला. येडेमच्छिंद्र येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकाच्या विद्युत पुरवठ्याबाबतचा प्रश्न पाटील यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचे नाव चर्चेत येऊ लागले आहे. एकंदरीत शिराळा मतदारसंघातील परंतु वाळवा तालुक्यात असलेल्या चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील पाटील यांच्यामुळे वाळवा— शिराळ्यातील शिवसेनेच्या संथ गतीने चाललेल्या बैलगाडीला आता वेग आला आहे. जि. प. निवडणूक : सक्षम उमेदवार देणारअभिजित पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. चिकुर्डेसारख्या मतदारसंघात अभिजित पाटील यांचे वजन आहे. त्यामुळे शिराळा मतदारसंघात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढणार आहे.आगामी पालिका आणि जि. प. निवडणुकीत चांगले उमेदवार देणार आहोत अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पावर यांनी दिली.