शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीराव नाईक ‘स्वाभिमानी’चे उमेदवार

By admin | Updated: July 16, 2014 01:25 IST

राजू शेट्टी : कोकण वगळता प्रत्येक विभागात जागांची मागणी करू

सांगली : माजी आमदार शिवाजीराव नाईक स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फेच आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. अद्याप जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. तरीही कोकण वगळता सर्वच विभागात आमची लढण्याची ताकद आहे. येत्या आठवडाभरात याचा निर्णय होईल, अशी माहिती ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज, मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, महायुतीच्या केंद्रीय समन्वय समितीचा मी सदस्य आहे. जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. गत विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेत २८८ जागांचे वाटप झाले होते. आता महायुतीत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय आणि शिवसंग्राम पक्ष या घटकपक्षांनाही काही जागा द्याव्या लागतील. या दोन्ही पक्षांच्या कोट्यातूनच त्या मिळणार आहेत. सांगली व कोल्हापूर हा आमचा बालेकिल्ला आहे. येथे आम्ही जागांसाठी आग्रही आहोत. सांगली जिल्ह्यात सध्या वाळवा, शिराळा, पलूस, जत, मिरजमध्ये सक्षम उमेदवार आहेत. तरीही मागणी केलेल्या सर्वच जागा मिळतील असे नाही. कोल्हापूरमध्येही आम्ही काही जागांची मागणी करणार आहोत. कोकण वगळता राज्यातील सर्वच विभागात आमची ताकद आहे. लढण्याची तयारीसुद्धा आहे. जेथे संघटना मजबूत असूनही सक्षम उमेदवार नाहीत, तेथे पक्षात नव्याने आलेल्यांनाही संधी देण्याचा विचार होईल. शिराळ्यातील शिवाजीराव नाईक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनच लढणार आहेत. त्यामुळे त्या जागेचीही मागणी आहे. हा मतदारसंघ माझ्या लोकसभा मतदारसंघातील असल्यामुळे / पान ९ वर