शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, मिरजेत शिवजयंती उत्साहात

By admin | Updated: February 19, 2017 23:47 IST

शिवरायांचा जयघोष : मराठा क्रांती मोर्चा, मुस्लिम समाजाच्यावतीने मिरवणुका; शिवभक्तीला उधाण

सांगली : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जयऽऽ’, ‘जय भवानी, जय शिवाजीऽऽ’चा गजर आणि लक्षवेधी मिरवणुकांनी रविवारी सांगलीतील वातावरण शिवमय झाले होते. विविध कार्यक्रमांनी शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त सांगली शहरातील हिंदू-मुस्लिम संघटनेची शोभायात्रा लक्षवेधी ठरली. मिरजेतही विविध संघटनांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशनच्यावतीने सांगलीत रविवारी शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक हणमंत पवार व हाजी रफिक बिडीवाले यांच्याहस्ते पूजन, तर असीफ बावा, नासिर शरीकमसलत यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी युसूफ मेस्त्री, जानिब मुश्रीफ, रामभाऊ पाटील, कय्युम पटवेगार, युसूफ जमादार, रवींद्र खराडे, झाकीर पिरजादे, बाबू तांबोळी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुस्लिम मावळे : लक्षवेधी सांगली शहरातील हिंदू-मुस्लिम संघटनेने आयोजित केलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. या मिरवणुकीत घोडे, सजीव देखाव्यांबरोबरच शिवरायांचे मुस्लिम मावळे आणि अंगरक्षकांच्या भूमिका साकारल्या होत्या. रिसाला रोड, स्टेशन चौक, हरभट रोड, मारुती चौक या मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जयश्रीताई पाटील, असीफ बावा, सुनीता मोरे, उत्तम कांबळे, करीम मेस्त्री यांच्यासह हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते. पारंपरिक वेशभूषा व घोडदळाच्या सहभागामुळे ही शोभायात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने अभिवादन रॅलीमराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शहरातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला शनिवारी रात्री बारा वाजता अभिषेक घालून शिवजन्मोत्सवास सुरुवात करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रविवारी शहरात अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात महिला व युवकांची संख्या लक्षणीय होती. पारंपरिक वेशभूषेत दुचाकीवरून विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा परिसरातून रॅलीची सुरुवात करण्यात आली. राम मंदिर, स्टेशन चौक, हरभट रोड, आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराज पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, शंभर फुटी या मार्गावरून शिवरायांची प्रतिमा घेऊन मिरवणूक निघाली होती. यावेळी डॉ. संजय पाटील, संजय देसाई, रणजित पाटील, योगेश पाटील, सुधाकर पाटील, बाळ सावंत, विजय भोसले, प्रदीप बर्गे, आशा पाटील, प्रिया गोटखिंडे, कविता गोंधळे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.