फोटो ओळ : कसबे डिग्रज सोसायटीमध्ये शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमावेळी आनंदराव नलवडे, प्रा. बाळासाहेब मासुले, रमेश काशीद, अरुण पवार, संजय शिंदे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे पारंपरिक शिवजयंती कोरोना नियम पाळून साधेपणाने साजरी करण्यात आली. कसबे डिग्रज सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदराव नलवडे व अध्यक्ष प्रा. बाळासाहेब मासुले यांच्याहस्ते पुतळा पूजन करण्यात आले. यावेळी संचालक रमेश काशीद, राजाराम चव्हाण, अरुण पवार आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत येथे सरपंच किरण लोंढे, उपसरपंच सागर चव्हाण, संदीप निकम, संजय शिंदे, प्रमोद चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन झाले. शिवप्रतिष्ठान कार्यालयात संजय शिंदे, अरुण पवार, रवी देसाई यांनी पूजन केले. भाग्यलक्ष्मी पाणी संस्था येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.