लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. यावेळी सायकल रिक्षावर दुचाकी ठेवून केंद्र सरकारचा निषेधही करण्यात आला. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. गॅसच्या दरातही १०० रुपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कबंरडे मोडले आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने सायकल मोर्चा काढण्यात आला. सांगलीतील स्टेशन चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. काँग्रेस भवन, कर्मवीर चौकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चात सायकल रिक्षावर दुचाकी ठेवण्यात आली होती. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.
या आंदोलनात दिगंबर जाधव, बजरंग पाटील, शंभुराज काटकर, सचिन कांबळे, डाॅ. महेशकुमार कांबळे, अमोल पाटील, चंद्रकांत मैगुरे, विशालसिंह रजपूत, महादेव मगदूम, अजित कांबळे, सिद्धार्थ चौगुले आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.