कुपवाड : कुपवाड शहर शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरुध्द अपशब्द वापरल्याबद्दल मंगळवारी सकाळी मुख्य सोसायटी चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतिमा पायाने तुडवीत निदर्शने करण्यात आली. यावेळी राणेंच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
जिल्हा परिषद शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर कुपवाड शहर शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत ‘कोंबडी चोर’ असे संबोधून निषेध करण्यात आला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, शहरप्रमुख रूपेश मोकाशी, अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण राणे यांची छबी असलेले फोटो तुडवून, फाडून तसेच नारायण राणेंच्या नावाने शंखध्वनी करीत आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी निषेध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड शहरातील मुख्य चौकात बंदोबस्त होता.
आंदोलनात युवा सेना शहर संघटक रवी माळी, कुपवाड शहर संघटक सूरज कासलीकर, सिद्धार्थ चौगुले, प्रमोद जाधव, अमोल कदम, कासम फकीर, संतोष पाटील, युवा सेना शहर समन्वयक ओंकार व्हनकडे, गोरख कांबळे, दीपक कांबळे, जमीर मकानदार, बसवराज असंगी, राजू कट्टमनी, रोहित दुधाळ सर्व पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी होते.