इस्लामपूर : केंद्र सरकारने केलेल्या अन्यायकारक पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा विरोध व भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शेतकरीविरोधी विधानाचा निषेध म्हणून शनिवारी येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी दानवे यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले. आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
आनंदराव पवार म्हणाले, केंद्र सरकार तळागाळापर्यंत असणाऱ्या घटकांचा विचार न करता देशात काम करत आहे. फसव्या घोषणा आणि पोकळ जाहिरातबाजीचा उद्योग सरकार करत आहे. त्यांच्याकडून सूडबुद्धीचे राजकारण सुरू आहे. त्यातच जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी बांधवांच्याविरोधात विधाने करणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या तर अकलेचे तारे तुटलेले आहेत. वादग्रस्त वक्तव्य करून कायम चर्चेत राहण्याची सवय त्यांनी आता बंद करावी. या सर्व बाबींचा शिवसेनेच्यावतीने जाहीर निषेध करत आहोत.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदकिशोर नीळकंठ, तालुकाप्रमुख युवराज निकम, नगरसेवक प्रदीप लोहार, वीर कुरळे, राजेंद्र पवार, अंकुश माने, वर्षा निकम, अर्चना माळी, उमेश पवार, सागर मलगुंडे, राहुल टिबे, मानसिंग पाटील, दीपक माने, बापू मस्के, कृष्णा पाटील, योगेश हुबाले, सूरज पाटील उपस्थित होते.
फोटो-१२इस्लामपुर२
फोटो-
इस्लामपूर येथील शिवसेना कार्यालयासमोर इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आनंदराव पवार, नंदकुमार निळकंठ, युवराज निकम, उमेश पवार, सागर मलगुंडे उपस्थित होते.