शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमधील जागा भाडेतत्त्वावर देण्यास शिवसेनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST

कुपवाड : शहरातील मुख्य चौकात असलेल्या सर्व्हे नंबर २४९९ मधील जागेचा महापालिकेकडून करण्यात आलेला भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव खंडित करण्यात ...

कुपवाड : शहरातील मुख्य चौकात असलेल्या सर्व्हे नंबर २४९९ मधील जागेचा महापालिकेकडून करण्यात आलेला भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव खंडित करण्यात यावा, अशी मागणी कुपवाड शहर शिवसेनेचे अध्यक्ष रूपेश मोकाशी यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली आहे.

रूपेश मोकाशी म्हणाले की, कुपवाडमध्ये महानगरपालिकेतर्फे मनपा सि. स. नं. २४९९ मधील जागा भाडेपट्ट्याने देण्याचा ठराव क्र. १९८ दि.१३ मार्च २०२० रोजी झालेला आहे. तो पूर्णतः चुकीचा आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणारी महापालिकेच्या मालकीची जागा भाडेतत्त्वावर देण्यापेक्षा समाजोपयोगी कारणासाठी वापरण्यात यावी. महापालिकेने केलेला ठराव क्रमांक १९८ मध्ये असे दिसून येते की, कुपवाड ग्रामपंचायत अस्तित्वात असताना परशराम विठोबा हंकारे यांना तीस बाय साठ फूट जागा तत्कालीन ग्रामपंचायत (कुपवाड) यांनी भाडेकराराने दिली होती. त्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपालिका व त्यानंतर महानगरपालिकेत रूपांतर झाल्याने हा करार रद्दबातल ठरतो. वास्तविक तत्कालीन ग्रामपंचायतीने परशराम विठोबा हंकारे यांच्याशी भाडेकरार झाला असताना आजरोजी दुसऱ्या व्यक्ती म्हणजे रावसाहेब परशराम हंकारे आणि योगेश बबन हिंगमिरे यांच्या नावे ठराव मंजूर केल्याचे आढळते. ही जागा आजरोजी खुली असून, त्याठिकाणी कोणीही व्यवसाय करत नाही. तरी जागा भाडेतत्त्वावर देण्यापेक्षा हा प्रस्तावच रद्द करण्यात यावा. महापालिकेने ती ताब्यात घेऊन सार्वजनिक कामासाठी उपयोगात आणावी. सध्याच्या मंजूर ठरावास कुपवाड शहर शिवसेनेचा विरोध आहे.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख रूपेश मोकाशी, संतोष पाटील, विठ्ठल संकपाळ, सुरेश साखळकर, प्रसाद रिसवडे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.