शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’साठी ८ पासून शिवसेनेचा चक्काजाम

By admin | Updated: December 31, 2015 23:58 IST

दिनकर पाटील : कवठेमहांकाळमध्ये आंदोलन

कवठेमहांकाळ : शेतीला म्हैसाळचे पाणी आणि जनावरांना चारा देण्याच्या मागणीसाठी कवठेमहांकाळ बंद आणि तहसील कार्यालयाच्या आवारात एकतारी भजन करून शिवसेनेने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले होते. परंतु शासनाला जाग आली नाही. हा लढा आणखी तीव्र करणार आहे. ८ जानेवारीपासून शिवसैनिक रस्त्यावर उतरणार असून, म्हैसाळचे पाणी सुरू होईपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा कवठेमहांकाळ तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिला.पाटील म्हणाले की, म्हैसाळचे पाणी दीड महिन्यापासून बंद आहे. खरीप हंगाम वाया गेला. रब्बी हंगामातील पिके जळून चालली आहेत. शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील जनावरे चाऱ्याअभावी तडफडू लागली आहेत. दुष्काळी भागातील बळिराजाला वाचविण्यासाठी म्हैसाळ योजना त्वरित चालू करावी. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अग्रणी पात्रातील बंधारे भरून द्यावेत. ढालगाव भाग आणि घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी द्यावे. जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ चारा डेपो सुरू करावेत, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.आम्ही जरी सत्तेत असलो तरी आमची पहिली बांधिलकी जनतेच्या प्रश्नांशी आहे. जनता दुष्काळात होरपळत असताना आणि चाऱ्याअभावी तडफडणारी जनावरे कसायाकडे नेण्याची वेळ असताना, हे विदारक वास्तव आता उघड्या डोळ्यांनी बघत बसणार नाही. येत्या आठ जानेवारीपासून शिवसेनेच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. आठ तारखेपासून शिवसैनिक रस्त्यावर उतरून चक्काजाम करतील. जोपर्यंत पाणी आणि चारा डेपो सुरू होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा दिनकर पाटील यांनी दिला आहे. यावेळी संजय चव्हाण, अनिल बाबर, दिलीप गिड्डे, अनिल पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)