शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, जनता दलाची शिष्टाई

By admin | Updated: November 2, 2014 00:39 IST

आयुक्तांशी चर्चा : एलबीटीबाबत कारवाईत घाई न करण्याची मागणी

सांगली : एलबीटीप्रश्नी व्यापारी व महापालिकेमध्ये सुरू झालेला संघर्ष थांबावा म्हणून जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील व शिवसेनेचे गौतम पवार यांनी आज शिष्टाईचा प्रयत्न केला. शनिवारी दुपारी त्यांनी आयुक्तांशी याबाबत चर्चा केली. कारवाईबाबत घाई न करण्याची मागणी करण्यात आली. त्यांच्या शिष्टाईला अद्याप यश आले नाही. कर भरण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केल्यानंतर आपण कारवाई करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आयुक्त अजिज कारचे यांनी व्यक्त केली. सांगलीच्या एलबीटी प्रश्नावर फौजदारी तसेच तपासणीच्या कारवाईच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या या तयारीनंतर व्यापारी व महापालिकेत संघर्ष निर्माण झाला आहे. टोकाचा संघर्ष होऊ नये म्हणून या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांसमवेत आयुक्तांची आज भेट घेतली. व्यापाऱ्यांना या कराचा त्रास होत आहे. तुमच्या कारवाईमुळे पेठ बंद करण्याचा तसेच आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिल्याची माहिती प्रा. पाटील यांनी दिली. आयुक्तांनी व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या व्यक्तीगत टीकेचाही उल्लेख केला. शहराचा विकास महत्त्वाचा आहे. महापालिकेचे कामकाज कराअभावी ठप्प होत असेल, तर कारवाई करावीच लागेल. त्यांनी आमच्याशी संघर्ष करण्यापेक्षा राज्य शासनाशी लढले पाहिजे. स्थानिक पातळीवर केवळ राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. व्यापाऱ्यांनी या गोष्टी समजून न घेता करावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी कर भरण्यास सुरुवात करावी. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या चार दिवसापासून व्यापारी व आयुक्तांमध्ये एलबीटीवरुन संघर्ष निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)