शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिरटे : गेल्या २५ ते ३० वर्षांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST

शिरटे : गेल्या २५ ते ३० वर्षांत सुटले नाहीत ते धरणग्रस्तांचे प्रश्न येत्या काही दिवसांतच मार्गी लागण्याची व्यवस्था करण्यात ...

शिरटे : गेल्या २५ ते ३० वर्षांत सुटले नाहीत ते धरणग्रस्तांचे प्रश्न येत्या काही दिवसांतच मार्गी लागण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारकडून ८० टक्के व लोकवर्गणीतून २० टक्के रक्कम उभारुन क्षारपडीमुळे हातातून गेलेली शेतजमीन पुन्हा पिकाऊ व्हावी यासाठीचा धोरणात्मक निर्णय येत्या काही दिवसातच घेतला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे गोरक्षनाथ मंदिर पोखर्णी तलाव येथे भक्तनिवास इमारत व विकास कामांच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, युवकअध्यक्ष संग्रामसिंह पाटील, महिला अध्यक्षा सुश्मिता जाधव, नीताताई पाटील, अलकाताई माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच जातपडताळीसुध्दा शाळेतूनच होण्यासाठी पाठपुरावा केला आहे. सरकारची तिजोरी मोकळी असली तरी येणाऱ्या अर्थसंकल्पात रितसर कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी तरतूद केली जाणार आहे. पोखर्णीच्या तलावाचे संवर्धन, बांधकाम व रस्ते यासाठीच्या निधीची तरतूद लवकरच केली जाईल.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी सभापती सचिन हुलवान यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच संदीप दबडे यांनी स्वागत केले. राजारामबापू बँकेचे संचालक ॲड. संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी आभार मानले.

यावेळी प्रकाश पाटील, अजित पाटील, दिलीपराव शेरेकर, हणमंतराव पाटील, सुरेश पाटील, शंभोराजे पवार आदी उपस्थित होते.

चौकट

कुठे गेले सरपंच...

येडेमच्छिंद्र येथे जयंत पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सरपंच गणेश हराळे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावरील कार्यक्रमाकडे मात्र त्यांनी पाठ फिरविली. ही गोष्ट लक्षात येताच ‘उद्घाटनाला होते, मग कुठे गेले सरपंच.’ अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी केली. यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

फोटो : १९ शिरटे १

अेाळ : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते गोरक्षनाथ मंदिर भक्तनिवासचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पाटील, दिलीप शेरेकर, सचिन हुलवान, संजय पाटील उपस्थित होते.