शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

शिरोळचा कल्लेश्वर तलाव गाळातच..!

By admin | Updated: August 11, 2015 22:29 IST

प्रस्ताव लालफितीत : तीन वर्षांपासून सर्वांचेच दुर्लक्ष

संदीप बावचे - शिरोळ -येथील ऐतिहासिक कल्लेश्वर तलावातील गाळ काढण्याचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून कागदावरच राहिला आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा स्त्रोत कायम तसाच राहावा यासाठी तलावातील गाळ काढण्याबाबतचा प्रस्ताव शिरोळ पंचायत समितीमार्फत जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावाकडे बऱ्याच वर्षांपासून सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. यंदाचे पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे किमान या वर्षीतरी हा प्रस्ताव मंजूर करून पुढील वर्षाचे नियोजन करता येणार आहे.छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील अनेक वर्षे दुर्लक्षित असणाऱ्या कल्लेश्वर तलावाचे सौंदर्य हरवून गेले आहे. कारण तलावात पाणीसाठा होणारे चाच (नाले) जादा शेतीच्या हव्यासापोटी नाहीसे झाले. त्यामुळे या तलावात सध्या गाजर गवत, तण, सरपटणारे प्राणी, ठिकठिकाणी खंदक व तलावाभोवती अतिक्रमणाचा विळखा असे स्वरूप आले असून, एकेकाळी शिरोळकरांची तहान भागविणारा कल्लेश्वर तलाव कायम दुर्लक्षित राहिला आहे. शिरोळच्या वैभवात भर घालणाऱ्या या तलावाचे सौंदर्य पुन्हा निर्माण करण्यासाठी व तलावाचे पर्यटनस्थळ होण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तलावात शासनाच्या निधीतून बगीचा, वृक्षसंवर्धन, योग्य पाणीसाठा, स्वच्छता, तलावाला संरक्षित भिंती, आदी सुविधा निर्माण होतील. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रयत्न करणे गरजेचे आहेत.तीन वर्षांपूर्वी या तलावातील गाळ कढण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात शासनाकडून तलाव, विहिरी, नाले, बंधाऱ्यातील गाळ काढून त्याठिकाणी पाण्याचा स्त्रोत चांगल्या पद्धतीने वाढावा या हेतुतून शासनाने उपक्रम हाती घेतला होता. या मोहिमेअंतर्गत शिरोळ तालुक्यात टंचाईग्रस्त योजनेतून तलाव, बंधारे यातील गाळ काढण्यात आला होता. यंदा पाऊस नसल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐतिहासिक कल्लेश्वर तलावातीलही गाळ काढण्याबाबचा प्रस्ताव देण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर या तलावातील गाळ काढण्यास परवानगी मिळणार होती. मात्र, हा प्रस्ताव शासनाच्या लालफितीतच अडकून पडला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर कल्लेश्वर तलावाला मोकळा श्वास मिळाला असता. मात्र, ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ अशीच अवस्था झाली आहे.