शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा नागपंचमी; जनहित याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:17 IST

शिराळा नागपंचमी; जनहित याचिका फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शिराळा येथे नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्यास व नाग खेळविण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. शिराळ्यातील अ‍ॅड. प्रदीप जोशी यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर व नितीन जामदार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. जिवंत नाग पकडू नये, त्याची पूजा करू नये व त्याला खेळवू नये, असा आदेश न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे. या आदेशाचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख व वनअधिकाऱ्यांनी पालन करावे, न्यायालय आदेशाचा भंग केला जात असेल तर कारवाई करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस व वन विभाग यांनी संयुक्तपणे जनजागृती करून शिराळ्यातील ग्रामस्थांना या परंपरेतून दूर करण्याचे प्रयत्न करावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. जिवंत नाग पकडून त्याची पूजा केली जात असल्याने शिराळ्यातील नागपंचमी जगप्रसिद्ध आहे; पण ही अनिष्ट प्रथा असल्याचा आरोप प्राणिमित्र संघटनांनी केला होता. ही प्रथा बंद करावी, या मागणीसाठी ते न्यायालयात गेले होते. त्यावर न्यायालयाने जिवंत नागाची पूजा करण्यास बंदी घातली आहे. ही बंद उठवावी, अशी ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. याप्रकरणी अ‍ॅड. प्रदीप जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. नागपंचमीबाबत पन्हाळा (जि. कोल्हापूर) येथे शिलालेख सापडला आहे. त्यामध्ये शिराळ्यातील ऐतिहासिक नागपंचमीचा उल्लेख आहे. पुरातन काळापासून नागपंचमी साजरी केली जात आहे, असे पुरावे जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालयात सादर केले होते. यापूर्वी झालेल्या सुनावणीला हे पुरावे न्यायालयात सादर झाले नव्हते. याचा न्यायालयाने विचार करून नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्यास व नाग खेळविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने ही जनहित याचिका फेटाळून पूर्वीचा आदेश कायम केला आहे. प्रथा बंद झाली पाहिजे : पाटील पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अजित ऊर्फ पापा पाटील म्हणाले, जुन्या अनिष्ट प्रथा बंद झाल्या पाहिजेत. बाल विवाहासह अशा अनेक प्रथा बंद झाल्या आहेत. शिराळ्यात जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याची व त्यांना खेळविण्याची प्रथा न्यायालयानेच बंद केली आहे. जनहित याचिकेवर आमच्यातर्फे अ‍ॅड. मनोज पाटील व आशिष पवार यांनी बाजू मांडली.