शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा नगरपंचायत राष्ट्रवादीकडे

By admin | Updated: May 26, 2017 14:49 IST

शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला झटका देत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली. १७ पैकी ११ जागा जिंकत राष्ट्रवादीने बाजी मारली असून, भाजपला ६ जागांवर समाधान मानावे लागले.

ऑनलाईन लोकमत
शिराळा, दि. 26 -  शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला झटका देत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली. १७ पैकी ११ जागा जिंकत राष्ट्रवादीने बाजी मारली असून, भाजपला ६ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. नागपंचमीदिवशी जिवंत नागपूजेस परवानगी मिळावी यासाठी सप्टेंबरमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थांनी व सर्वच पक्षांनी बहिष्कार घातला होता. 
 
मात्र त्यानंतर बहिष्काराची तीव्रता कमी होत गेली. मार्चमध्ये पुन्हा निवडणूक जाहीर झाली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ दोन तासात सर्वच पक्षांनी आणि अपक्षांनी अर्ज भरले. १७ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात होते. भाजप, राष्ट्ररवादी व कॉँग्रेस या तीन पक्षांच्या उमेदवारांसह सहा अपक्षांनी मतदारांचा कौल अजमावला. राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक गटाचे प्राबल्य असलेल्या शिराळा शहराची पहिलीच निवडणूक असल्याने नगरपंचायतीवर पहिला झेंडा कोणाचा, तसेच पहिले नगरसेवक कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बहुतांशी प्रभागांत तिरंगी लढत झाली.
 
बुधवार, दि. २४ रोजी चुरशीने ८७.५१ टक्के मतदान झाले. १०५१३ पैकी ९२०० मतदारांनी मतदान केले. तिन्ही पक्षांनी सत्तेचा दावा केला होता. शुक्रवार, दि. २६ रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाली. अवघ्या तासाभरात निकालही जाहीर झाला. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी ११ जिंकत राष्टÑवादीने सत्ता मिळवली. भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांच्या ‘महाडिक युवा शक्ती’शी भाजपने हातमिळवणी केली होती. प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.