शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा नगरपंचायतीची निवडणूक लागली!

By admin | Updated: May 5, 2017 23:37 IST

शिराळा नगरपंचायतीची निवडणूक लागली!

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीवरील बहिष्काराचा निर्णय शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना वगळता इतर राजकीय पक्षांनी झुगारून दिला. अवघ्या दोन तासांत सतरा जागांसाठी १४१ अर्ज दाखल झाले. त्यामुळे बहिष्कार आणि बिनविरोध निवडीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.नागपंचमीदिवशी येथील जिवंत नागपूजेस परवानगी मिळावी, यासाठी नोव्हेंबरमध्ये झालेल्या नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीवर सर्व पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे कोणीही निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. मात्र, दि. ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी झालेल्या वादामुळे बहिष्कार टाकणाऱ्यांमध्ये फूट पडली होती. काही राजकीय पक्षांनी बहिष्काराच्या निर्णयापासून फारकत घेतली. त्यानंतर हळूहळू बहिष्काराबाबतची तीव्रता कमी झाली. मात्र, राजकीय टीकाटिप्पणी वाढली होती. ते पाहून शिवसेनेने बहिष्काराचा निर्णय कायम असल्याचे निवेदन प्रसिद्ध दिले होते. इतर पक्षांचे नेते, कार्यकर्ते या निर्णयाबाबत शिराळ्याच्या नागरिकांसोबत असल्याचे सांगत होते. मात्र, त्यांची निवडणुकीची तयारी सुरू होती.दि. २८ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली.ोव्हा सर्वच पक्ष, संघटना व अपक्ष उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ केला. शिवाय त्या अर्जांची तपासणीही निवडणूक अधिकाऱ्यांकडून करून घेण्यात येत होती. प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल केले नव्हते. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस होता. दुपारी एकच्या दरम्यान एकाच वेळी १४ ते १५ उमेदवार अर्ज दाखल करण्यास आले. हे समजताच नगरपंचायतीत गर्दी उसळली. त्यानंतर अवघ्या दोन तासात १४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले.शहरात १७ प्रभाग असून १७ जागांसाठी १४१ अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग एक : ८ प्रभाग दोन : ९, प्रभाग तीन : ६, प्रभाग चार : ५, प्रभाग पाच : ६, प्रभाग सहा : ९, प्रभाग सात : ९, प्रभाग आठ : ८, प्रभाग नऊ : ८, प्रभाग दहा : १२, प्रभाग अकरा : १०, प्रभाग बारा : ५, प्रभाग तेरा : ७, प्रभाग चौदा : १६, प्रभाग पंधरा : ८, प्रभाग सोळा : ८, प्रभाग सतरा : ७, असे १४१ अर्ज दाखल झाले आहेत. यात प्रामुख्याने माजी उपसरपंच सुनील कवठेकर, माजी सदस्य शंकर कदम, अजय जाधव, अभिजित नाईक, विश्वप्रतापसिंह नाईक, छाया सदाकळे, गौतम पोटे, कुसूम निकम, सविता यादव, अर्चना कदम, कीर्तीकुमार पाटील, विक्रमसिंह नाईक, अ‍ॅड. नेहा सूर्यवंशी, संतोष देशपांडे, विद्याधर कुलकर्णी, केदार नलवडे, राम जाधव, सत्यजित कदम, नमिन मुजावर, सुनंदा सोनटक्के, सीमा कदम, ज्योती शेटे, स्रेहल जाधव, उत्तम डांगे, संभाजी नलवडे, सुनीता निकम, रूपाली कदम, अर्चना शेटे, अभिजित यादव आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने बहिष्कारासोबत निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे. तहसील कार्यालय व परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे त्यावर लक्ष ठेवून होते.शिवसेनेचा बहिष्कार कायममागीलवेळी निवडणूक जाहीर झाल्यानंतर बहिष्कार टाकण्याबाबतचे पहिले निवेदन शिवसेनेने प्रसिद्धीस दिले होते. यावेळीही शिवसेनेने बहिष्कार कायम ठेवून एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.... आणि तणाव नाहीसा झाला !दि. २८ एप्रिलपासून शुक्रवारी (दि. ५) दुपारी एकपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार दीपक शिंदे, सर्व अधिकारी व कर्मचारी उमेदवारी अर्ज कोण दाखल करतो, या प्रतीक्षेत होते. दुपारी एकच्या दरम्यान अर्ज भरण्यास उमेदवार आलेले पाहून या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत:च्या कक्षाबाहेर येऊन याबाबत खात्रीही केली.