शिराळा : पंचायत समितीच्या सभापती वैशाली माने यांनी पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याकडे दिला. राष्ट्रवादीच्या निर्णयानुसार हा राजीनामा दिला असून नूतन सभापतिपदी मनीषा गुरव (कणदूर) यांचे नाव निश्चित झाले आहे.
आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जो निर्णय घेतला होता, त्यानुसार सभापती माने यांना दिलेला कार्यकाळ संपल्याने हा राजीनामा दिला आहे. पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे एक सदस्य मृत झाल्याने ३, राष्ट्रवादीचे ३ तर भाजपचे १ सदस्य असे बलाबल आहे. अडीच वर्षे काँग्रेस व अडीच वर्षे राष्ट्रवादीकडे सभापतिपद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार राष्ट्रवादीकडे सभापतिपद आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक सहा महिन्यांनंतर होणार आहे. हा कार्यकाळासाठी कणदूर येथील मनीषा गुरव यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.