शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

शिंदेवाडीत भीषण आग

By admin | Updated: April 24, 2017 23:59 IST

शिंदेवाडीत भीषण आग

कवठेमहांकाळ/देशिंग : शिंदेवाडी (हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ) येथे भरदुपारी ऊसतोडणी मजुरांच्या वस्तीवर अचानक आग लागून ३१ झोपड्या जळून खाक झाल्या. आगीत नऊ शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून, एक दुचाकी, तीन सायकली, रोख रकमेसह संसारोपयोगी साहित्याचे सुमारे १३ लाखांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता घडली. जत तालुक्यातील मोटेवाडी, पांडोझरी या भागातून ऊसतोडणी मजुरांची ८० कुटुंबे शिंदेवाडी परिसरात गेल्या तीन वर्षांपासून राहत आहेत. ऊस हंगाम संपल्यानंतर परिसरातील द्राक्षबागा, शेतात मजुरी करून या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. गावापासून जवळच असलेल्या माळावर या कुटुंबांनी झोपड्या उभ्या केल्या आहेत. सोमवारी सर्वजण मजुरीसाठी गेले असताना, दुपारी अडीचच्या सुमारास येथील एका झोपडीस आग लागली. एकमेकांना खेटून असलेल्या सर्वच झोपड्या एकापाठोपाठ एक पेटत गेल्या. आगीत मजुरांचे सर्व संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली. या झोपड्यांमध्ये तीस शेळ्या होत्या. यातील एकवीस शेळ्यांना वाचविण्यात यश आले, तर नऊ शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. याशिवाय रोख रक्कम, दुचाकी, तीन सायकली, धान्य असे सुमारे १३ लाखांचे नुकसान झाले. सुमारे ३१ झोपड्या आगीत खाक झाल्या.आगीची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात आणणे कठीण झाले होते. यामुळे मोठे नुकसान झाले.गावकामगार तलाठी रुपनर यांनी घटनेचा पंचनामा केला. यामध्ये एकूण तेरा लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी सरपंच चंद्रकांत कवठेकर व ग्रामस्थांनी या मजुरांना चटई, धान्य, कपडे व संसारोपयोगी साहित्याची मदत केली. (वार्ताहर)