शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

संघर्षाच्या शिवारात शेट्टी-खोत यांची पायपीट

By admin | Updated: May 28, 2017 23:51 IST

संघर्षाच्या शिवारात शेट्टी-खोत यांची पायपीट

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश पदयात्रेत खासदार राजू शेट्टी यांच्या पायाला फोड आले तरीही ते मागे हटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही शेट्टींना सहानुभूती मिळत आहे. याउलट कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपबरोबर गटबंधन घट्ट करीत शेतकऱ्यांच्या शिवारात पायी चालून चळवळीला ताकद देण्याचा प्रयत्न चालवला आहे. संघर्षाच्या शिवारात दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या पायवाटा निवडत शेतकरी चळवळीची कास धरली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सोमवारी होणाऱ्या भाजपच्या शेतकरी मेळाव्यात इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील हे शहराच्या विकासासाठीच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.कृष्णा-वारणा खोऱ्यातील ऊस उत्पादक उसासह कमी काळात उत्पन्न देणाऱ्या नगदी पिकाकडे वळू लागला आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील शेतकरी चांगलाच सधन होत चालला आहे. अनेकांनी ग्रीन हाऊस, पॉली हाऊसच्या माध्यमातून आधुनिक शेतीची कास धरली आहे. त्यामुळे पूर्वीच्या प्रमाणात आता शेतकरी संघटनांना शेतकऱ्यांची साथ मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे या शेतकरी नेत्यांना आता आपला भाग सोडून आपला मोर्चा विदर्भ, मराठवाड्यात वळवावा लागला आहे. त्यातूनही जे काही शेतकरी या संघटनांच्या पाठीशी आहेत, त्यांच्या जिवावर शेट्टी आणि खोत यांचे राजकारण सुरू आहे. अलीकडील काळात त्यांच्यात पडलेल्या दरीचे राजकारणही आता चांगलेच रंगले आहे. त्याचाच फायदा भाजप उठवण्याचा प्रयत्न करत आहे.इस्लामपूर पालिकेवर एक हुकमी सत्ता असलेल्या आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेल्या निशिकांत पाटील यांनी ऐन पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात सक्रिय असलेल्या विकास आघाडीशी हातमिळवणी केली. त्यावेळीच भविष्यात निशिकांत पाटील भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट होते. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांना निधीची कमतरता पडू नये, यासाठीच निशिकांत पाटील हे सोमवार, दि. २९ रोजी होणाऱ्या भाजपच्या शेतकरी मेळाव्यात भाजपवासी होणार आहेत.भाजप प्रवेशाबाबत ‘लोकमत’शी बोलताना निशिकांत पाटील म्हणाले, गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ इस्लामपूर शहराने आ. जयंत पाटील यांच्याकडे सत्ता दिली होती. परंतु त्यांच्याकडून शहराचा म्हणावा असा विकास झाला नाही. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो. राष्ट्रवादीतून बाहेर पडताना मला खूप यातना झाल्या. शहराच्या विकासासाठीच आपण विरोधाची भूमिका घेत निवडणूक लढवली. भविष्यात होणाऱ्या भुयारी गटर योजना, २४ बाय ७ नळ पाणी योजना, शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण, चौक सुशोभिकरण आदी प्रमुख कामांसह रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी १०० कोटींहून अधिक निधीची गरज आहे. त्यासाठीच आपण भाजपात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. शहराचा विकास हाच ध्यास आहे. शहराबाहेर जाऊन राजकारण करण्याचा उद्देश नाही. इस्लामपूरचा सर्वांगीण विकास हाच उद्देश असणार आहे.वाळू तस्कर झाले मालामालकृष्णा खोऱ्यातील मोठे वाळू तस्कर राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. गेल्या ३० वर्षांत आ. जयंत पाटील यांच्या कृपेने ते मालामाल झाले आहेत. तेच आता वाळू ठेकेदार स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी मंत्री सदाभाऊ खोत यांना चिकटले आहेत. ते सोमवारच्या कार्यक्रमात भाजपमध्ये येणार होते. परंतु या वाळू तस्करांची अवस्था आता ‘तेलही गेले, तूपही गेले....’ अशी झाली आहे.करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न विद्यमान आ. जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी वाळवा तालुक्यातील माजी आ. विलासराव शिंदे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी खोत यांनी मोठे प्रयत्न केले; परंतु यामध्ये ते सपशेल फेल झाले आहेत. शिंदे यांच्यासह त्यांनी हुतात्मा संकुल, कामेरीचे ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, वैभव पवार, राष्ट्रवादीतील काही नगरसेवक, पेठनाक्यावरील महाडिक गटाचे काही मोहरे टिपण्यासाठी प्रयत्न केले. आता यातील कोणते चेहरे सोमवारच्या कार्यक्रमात भाजपमध्ये जाणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.