शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टींकडून सत्तेसाठी शेतकऱ्यांचा विश्वासघात

By admin | Updated: October 15, 2015 00:35 IST

पंजाबराव पाटील : एफआरपीसाठी बळिराजा संघटना रस्त्यावर उतरणार

इस्लामपूर : गेल्या दहा वर्षांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदराची आंदोलने केली. तेच शेट्टी आता सत्ता, संपत्ती, मंत्रिपदाच्या लाभासाठी आंदोलनाला बगल देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात करीत आहेत, असा घणाघाती आरोप बळिराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांनी बुधवारी केला.इस्लामपूर येथे न्यायालयीन कामकाजासाठी आल्यावर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, उसाच्या एफआरपीनुसार दर देण्यावरून सरकार, कारखानदारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. खा. शेट्टी आता शेतकऱ्यांविषयी बेगडी कळवळा दाखवून मतदारसंघ टिकवून ठेवत आहेत. त्यामुळे एफआरपीसाठी बळिराजा संघटना रस्त्यावर उतरेल. प्रसंगी त्यासाठी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावू.पाटील म्हणाले की, मंत्री समितीच्या बैठकीत खा. शेट्टी सरकार व कारखानदारांच्या निर्णयाला मान्यता देतात. यावरून त्यांना आता शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नसल्याचे स्पष्ट होते. मंत्रिपदासाठी सरकारची मर्जी सांभाळताना ते आता शेतकऱ्यांच्या विश्वासघात करीत आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपने ऊस आंदोलनातील खटले मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर काहीच निर्णय नाही. बी. जी. पाटील म्हणाले, जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन काम करणारी चळवळ मोडण्याचे काम खा. शेट्टी व सदाभाऊ खोत करीत आहेत. शेतकऱ्याला किमान हमीभाव देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खा. शेट्टी मिठ्या मारत आहेत. मग ही मिठी शेतकऱ्यांना मारण्यासाठी आहे का? आघाडी सरकारच्या काळात खा. शेट्टी तीव्र आंदोलन करायचे. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीला बदनाम करण्याची सुपारी खा. शेट्टी यांनी भाजपकडून घेतली होती का? अशी शंका येते. सत्ता, संपत्तीच्या लाभासाठी ते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. यावेळी चंद्रकांत जाधव, उत्तम साळुंखे, साजीद मुल्ला, बाबासाहेब मोहिते, अशोक सलगर, विक्रम थोरात, दीपक पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)बांधकाम कामाची गुणवत्ता तपासावीबी. जी. पाटील म्हणाले की, मोर्चा काढण्याच्या नावाखाली खा. शेट्टींकडून भावनेशी खेळ सुरू आहे. ऊस बिलातून शेतकऱ्यांचे पैसे कपात करण्यासाठी आ. जयंत पाटील व खा. शेट्टी यांचे साटेलोटे आहे. जिल्हा बँकेत दिलीप पाटील यांची भेट घेऊन हे कपातीचे कुभांड रचले गेले आहे. शेट्टी व जयंत पाटील यांच्या पिलावळीची बांधकाम खात्यात चलती आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या बांधकामाची गुणवत्ता तपासली पाहिजे.