कडेगाव : कडेगाव तालुक्यातील वंचित १७ गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्यात येणार असून, कडेगाव तालुक्यातील ३९ दुष्काळी गावांसाठी उर्वरित ८६ लाख १३ हजारांचे अनुदान तातडीने देऊ, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिले. कडेगाव तहसील कार्यालय येथे देशमुख यांनी लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, गोपीचंद पडळकर, आदी उपस्थित होते.देशमुख यांनी कडेगाव बसस्थानकाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जि. प. सदस्य सुरेश मोहिते यांनी कडेगाव तालुक्यातील १७ गावांचा समावेश दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत करण्याबाबतची मागणी केली. यावर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करून या १७ गावांचा समावेश दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.यावेळी राजाराम गरुड यांनी कडेगाव तलावात टेंभू योजनेचे पुरेसे पाणी सोडले जात नाही. याकडे लक्ष वेधले. देशमुख यांनी तालुक्याचे ठिकाण असलेल्या कडेगाव तलावात पाणी सोडण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. परंतु, याबरोबरच शिवाजीनगरपासून पुढील नेर्ली, अपशिंगे, कोतवडे, खांबाळे, तडसर गावांना पाणी कमी पडू नये, याची दक्षता घ्यावी, असेही सांगितले.ताकारी योजनेची शिरसगाव हद्दीतील गळती वारंवार सूचना करूनही काढली जात नाही, असे सरपंच सतीश मांडके यांनी सांगितले. याबाबत योजनेच्या अधिकाऱ्यांना लक्ष घालण्यास विजय देशमुख यांनी सांगितले. कृषी विभागाचे अधिकारी नामदेव पिंजारी यांनी कामाबाबत माहिती दिली. यावेळी पृथ्वीराज देशमुख व उपस्थित ग्रामस्थांनी (पान ८ वर)
‘ती’ १७ गावेही दुष्काळग्रस्त यादीत घेणार
By admin | Updated: May 17, 2016 01:47 IST