शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

सावळजला बंगला फोडला

By admin | Updated: June 1, 2014 01:09 IST

नऊ लाखांचा ऐवज लंपास : ३५ तोळे सोने, दीड किलो चांदीचा समावेश

तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील ‘साईप्रसाद’ हा बंगला फोडून सुमारे ३५ तोळे सोन्याचे व दीड किलो चांदीचे दागिने आणि रोख १० हजार असा नऊ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. नारायण गणपती पाटील यांचा हा बंगला असून, घरात कोणी नसल्याचे पाहून कटावणीच्या सहाय्याने कुलपे उचकटण्यात आली आहेत. ही घटना आज, शनिवारी सकाळी उघड झाली असली तरी चोरी दोन दिवसांच्या कालावधीत घडली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेने सावळज परिसरात खळबळ उडाली. नारायण पाटील व त्यांची पत्नी सुमन हे दोघेच घरात राहतात. पाटील निवृत्त मुख्याध्यापक, तर सुमन पाटील या वायफळे जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रप्रमुख आहेत. त्यांचा एक मुलगा निशिकांत पुण्यात, तर दुसरा मुलगा नंदकुमार हा नोकरीसाठी बंगलोरला असतो. डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी नारायण पाटील पत्नीसह पुण्याला मुलाकडे दि. १६ मेरोजी गेले होते. सावळजला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एकवीरानगरमध्ये भरवस्तीत त्यांचा बंगला आहे. आज सकाळी पाटील यांच्या बंगल्याचे कुलूप रस्त्यावर पडल्याचे व दरवाजा उघडा असल्याचे शेजारी राहणार्‍या रामचंद्र तोडकर यांच्या लक्षात आले. चोरी झाल्याचा संशय आल्याने तोडकर यांनी पोलिसांसह पाटील यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. दुपारी चारच्या दरम्यान नारायण पाटील आल्यानंतर चोरीस गेलेल्या ऐवजाचा तपशील लक्षात आला. घरातील तीन तिजोर्‍या चोरट्यांनी फोडल्या आहेत. सुमन पाटील व त्यांच्या दोन सुनांसह लहान मुलांचे दागिने वेगवेगळ्या कपाटात ठेवण्यात आले होते. कपाटांचे लॉकर फोडून आतील कपडे, इतर साहित्य बाहेर उचकटून टाकून दागिने लंपास करण्यात आले आहेत. रात्री जत, विटा, सांगली, तासगाव व स्थानिक गुन्हे अन्वेषण, गुन्हे प्रगटीकरण अशा विविध शाखांच्या पोलिसांनी घटनास्थळी भेटी दिल्या. ठसेतज्ज्ञही दाखल झाले होते. चोरीस गेलेल्या ऐवजाचा तपशील असा : दोन नेकलेस (पाच तोळे), कंगण जोड (चार तोळे), बिंदल्या, मनगट्या व पाच अंगठ्या (चार तोळे), एक साखळी (दीड तोळे), चार बिलवर (पाच तोळे), एक जोड पाटल्या (पाच तोळे), कानातील वेल (आठ ग्रॅम), एक गंठण (साडेचार तोळे), एक लक्ष्मीहार (सव्वा तोळे), बोरमाळ दोन नग (दीड तोळे), लेडीज अंगठ्या (एक तोळे), रिंगा (अर्धा तोळा), फुले चार नग (अर्धा तोळा) व एक मंगळसूत्र (अर्धा तोळा). चांदीची २०० नाणी (एक किलो), दोन गणेशमूर्ती (१०० ग्रॅम), पैंजण, हातकंगण व दोन वाळे (१५० ग्रॅम), मेखला, दोन आरत्या, दोन समया, दोन वाट्या, एक अत्तरदाणी (७५० ग्रॅम), दोन करदोडे (२५० ग्रॅम), एक गुलाबदाणी (७५० भार) व रोख १० हजार. पोलिसांनी पंचनाम्यात ७ लाख ४९ हजार रुपये किमतीच्या ऐवजाची चोरी झाल्याचे म्हटले असले तरी, बाजारभावानुसार ही किंमत नऊ लाखावर जाते. (वार्ताहर)