शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीमुळे गावच्या विकासाला आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST

तांदूळवाडी : गावाला विविध नागरी सुविधा देत गावाच्या विकासाला निश्चित आकार देणारी संस्था म्हणजे ग्रामपंचायत आहे. आपल्या गावात गावाच्या ...

तांदूळवाडी : गावाला विविध नागरी सुविधा देत गावाच्या विकासाला निश्चित आकार देणारी संस्था म्हणजे ग्रामपंचायत आहे. आपल्या गावात गावाच्या वैभवात भर घालणारी ग्रामपंचायतीची इमारत उभी राहत आहे. या नव्या इमारतीतून लोकाभिमुख सेवा द्या, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

तांदूळवाडी (ता. वाळवा) येथे ग्राम सचिवालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व गावातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक बी. के. पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव भीमरावआण्णा पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, सरपंच रमेश पाटील आदी उपस्थित होते. या वेळी उद्योजक शैलेश पाटील तसेच जाधव व शेळके कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमात गावातील कोरोना योद्धे व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या ताकदीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत चांगले यश मिळेल.

मानसिंगराव नाईक म्हणाले, नूतन इमारतीस जिल्हा नियोजनमधून २० लाखांचा निधी दिला आहे. अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणेसाठी चाैदाव्या वित्त आयोगातून २० लाख रुपयांचा निधी दिला आहे.

भीमरावआण्णा पाटील यांनीही मनाेगत व्यक्त केले. या वेळी डॉ. दिलीप पाटील, डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. अमित माने, भारती लोहार, सुनीता चौगुले, विश्वास पाटील, वैशाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

माजी उपसरपंच अर्जुन पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगी माजी सभापती ॲड. विश्वासराव पाटील, वारणेचे संचालक किशोर पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक दिलीपराव पाटील, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी रवींद्र पवार, प्रताप पाटील, जयसिंग पाटील उपस्थित होते. संदीप शिंदे यांनी आभार मानले.

फोटो : १८ तांदूळवाडी १

ओळी : तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील ग्राम सचिवालय इमारतीचे भूमिपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार मानसिंगराव नाईक, भीमराव पाटील, सरपंच रमेश पाटील, प्रताप पाटील, राजाराम पाटील, अर्जुन पाटील उपस्थित हाेते.